ये देवा तु झोपला की काय
जेव्हा चुकतो तुझा भक्तभक्त
म्हणे तु महाकाय तांडव करतोस
तु तांडव विसरला तर नाय
मिरवणुकीत वाजतय नविनच काय
हाताला धरलया
बाई वाड्यावर या
शांताबाई
हे पाह्यायाला तु झोपला तर नाय
बघतोय की उघड्या डोळयानी
आयाबायांचा उघडा नाच
आजुन पण नाही वाट का लाज
का? त्या साठी पण घेतोस लाच
आरे दगडाच्या देवळातुन अनं मुर्तीतुन बाहेर ये
पाहा आजुबाजुला कित्येक तरी असतील भुकेलेले
ती तुला नैवद्य हवाच असेल
हे बघुन तु खातच बसेल
ये देवा जागा होरे बाबा
लय वाढतोय तुज्या नावाचा तमाशा
करतात नावाचा तुझ्या धंदा
तु पण पहाशिल निमुट पणे
तुला मिळेल सर्व काय जागेवरीच
त्या साठी रक्त ओकतात रे काही जण
तुला नाही का जाणवत
अरे!!! विसरलोच
तु तर झोपला आहेस
आक्रोशाने त्या कळसाला देखिल तडा गेलाय
येरझऱ्या घालुन पाय मेटाकुटीला आलाय
तुला काय पाझर फुटेना
देगडाच देव तु काळीज काय पेटेना
शंका वाटु लागलीय तुझ्या विषय
तु आहेस का नाही
बहुतेक तर नसशिलच
आसता तर धावुन आला असता
यांच्या मुंडीवर बसला असता
सांग देवा तुला
भावना आहे का नाय
ज्याला भावना नाय
मग तु देव पण नाय
.............✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
No comments:
Post a Comment