Sunday 24 December 2017

11

आज लढतोय वेळेशी
तरी हारनार नाही मी
प्यादा असुन सुद्धा
एक दिवस वजीराला मात देईल मी

Sunday 17 December 2017

सुट्टीचे चार दिवस

*सुट्टीचे चार दिवस*
➖➖➖➖➖➖➖➖➖
चार दिवसाची सुट्टी संपवुन
निघताना मनात खुप दाटलं
दुरवर जाऊन
एकदा माग वळुन पाहिल्यावर
खुप वाईट वाटलं

मित्रा सोबत तास अनं तास
गप्पा मारून झाल्यावर
जेव्हा तो भरल्या मनाने बोलला
परत पुन्हा कधी येशिल
तेव्हा खुप खुप वाईट वाटलं

निघतान घराच्या बाहेर पडल्यावर
एक कटाक्ष जेव्हा दारातील जनावराकडे बघतो
तेव्हा ती जनावरं खुप आशेने माझ्याकडं पहातात
दुरवर जाईपर्यंत रस्त्याकडे बघतात
तेव्हा खुप वाईट वाटलं

जेव्हा
आई म्हणते वेळेला जेवत जा
अनं वडील काळजी पोटी म्हणत्यात
पोहचल्यावर फोन कर
तेव्हा खुप वाईट वाटलं

जेव्हा दारा मागुन ती पहाते
डोळ्यांनीच सर्व काही बोलुन जाते
पाहुन क्षणभर ती जेव्हा डोळे मिटते
तेव्हा खुप वाईट वाटलं

दर महिन्याला हेच
पुन्हा पुन्हा होतं
तेव्हा खुप वाईट वाटतं
➖➖➖➖➖➖➖➖➖
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
जि.पुणे
8600138525

Saturday 4 November 2017

10

जा जा फुला
सांगतो मी तुला
हवा आहेस तु तीला
पोहताच निरोप दे मला...

नागेश

Sunday 15 October 2017

प्रिय मित्रा

प्रिय मित्रा,
                बरेच दिवस झालेे आपली भेट झाली नाही.  अनं आपण भेटलो ही नाही, ज्या प्रमाणे मला तुझी आठवण येते त्या प्रमाणे तुला ही येत असेल.  मी तुला सोडुन आलो, यात माझं बरच काही चुकलं आसेल.  पण यातच आपल्या सर्वांच हीत आहे याची कल्पना करून मला हे पाऊल उचलावं लागलं. तुझ्या पासुन आल्यावर कसल्या कसल्या संकटांना मला एकट्याला सामोरे जावे लागले. अनं मी त्यां तोंड देण्याचा प्रयत्न ही केला.  जसे एखादी तुफान लाट यावी अनं एखाद्या खडकाला धडकीनी धडकावी आणी त्याच्या त्या प्रहाराने पाणी चौफेर भिर्रर्रकले जावेत. त्या उडणाऱ्या पाण्यापासुन होणाऱ्या थेंबांची अन माझी गत काय वेगऴी नव्हती. पण आता कुठ तरी स्थिरावत आहे. तुझ्या पासुन आल्यावर खऱ्या अर्थाने स्वार्थी दुनिया पाहीली.  फक्त अनं फक्त स्वता:चा विचार करणारी लोकं याचं दुनिये सध्यातरी वास्तव आहे.  म्हणुन जरा पुर्वीचे दिवस आठवले.  पैशासाठी नाही तर एकमेकांच्या जीवा साठी जगलो.  अनं आज ही हा असाह्य दुरावा सहन करत तु अनं मी जगत आहे.  खऱ्या दुनियादारीची सुरवात आता कुठेतरी होत आहे.  प्रत्येकजण रूबाब दाखवण्या प्रयत्न करतात. मग खचतो मी ही कधी तरी.  लोखंडाचा नाही ना मी, मी ही शेवटी हाडा-मांसाचा एक माणुसच ना. कधी कधी माझी ही मनस्थिती बिघडती रे. पण करणार तरी काय आपलं असं म्हणारं आहे तरी कोण. जेवणाच्या डब्याकडे पाहीले की तुझी आठवण येते आणी तु येशिल असा क्षणभर भास होतो अनं हातातील घास हातातच राहतो. आठवतो मग तु भरवलेला क्षण. एक तीळ सात जणांनी खल्ला होता हे वाक्य आठवते अनं काही क्षण विरंगतो भुतकाळात. मग बसतो एकांतात क्षणभर त्या चहा च्या टपरीवर. तेव्हा खरच माझं मलाच मी अनाथ असल्या सारखं वाटतं रं. मग फक्त तो रीकामा चहा चा ग्लास सोबतीला. यदा कदाचित आश्रु ही ओघळत असतील कधी. मग माझेच मी पालथ्या हाताने आश्रु पसण्याचा असाह्य प्रयत्न करतो. अनं पुन्हा त्याच दुनियादारीत सामील होण्याचा प्रयत्न करतो. आपली माणस; आपली माती; अनं काळजातीलं नाती सोडुन आल्या बद्दलं. मग मन ही मन कधी कधी पश्चाताप ही करतो. सकाळी ज्या सुर्याची मी आतुरतेने वाट पाहीचो त्याचीच मी आजकाल मावळतीला आतुरतेने वाट पाहत असतो कारण तो कमीत कमी माझ्या दुख:त तरी सामील होतो. आशातच रात्र ही जाते. प्रत्येक संकटात,  सुखात, दुख:त, आनंदत तुझी पहिली आठवण येते.
        मग थरथरत्या हाताने एकांत रात्रीला लिहितो मनातले भाव. अनं ओघळतो एकांतात पुन्हा आश्रु.
जेव्हा कधी भावना अनावर होतील तेव्हा
पुन्हा आसचं एक पत्र लिहिणं आशाचं एका रात्री..............
   कळावे,
तुझाच मित्र.
🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड जि.पुणे
8600138525
दि. 15/16 अॉक्टोबंर 2017
रात्री 2:19 मिनिटे

Saturday 30 September 2017

9

सांग हे देवा
माझा पिल्लु कस असेल
घरी मला पाहुन
ते खदळेनं, अनं हसेल...
:-नागेश टिपरे
  ८६००१३८५२५

Wednesday 30 August 2017

🌿🌷🌿🌿🌿🌷🌿🌿
वाऱ्याची ती झुळुक येता
फुलपाखरू हे फिरतय
फांदीवर नाजुक फुल डोलंता
त्याच्या संग माझं ही मन झुलंतय
                          *नागेश टिपरे*
🌿🌿🌿🌿🌷🌿🌿🌿

तू माझी अर्धांगिनी

तू माझी अर्धांगिनी

मैना म्हणुन बोलुन गेली
आण्णा भाऊंची वाणी
तीशीच जरा आहे गं
तू माझी अर्धंगिनी

सुख दुखा:त दिली साथ
जळते जशी दिव्याची वात
त्या हृदयाची तु आहेस राणी
तु माझी अर्धांगिनी

तुच माझी राधा तुच माझी मीरा
माझ्यासाठी तु एक कोहिनुर हिरा
संसार आपला या सदनी
तू माझी अर्धांगिनी

दाखवु जगाला प्रेमाची गाथा
कधी खड्डा तर कधी येईल माथा
कर विचार तु हा मनो-मनी
तु माझी अर्धांगिनी

मृत्यु नंतर नको स्वर्गाच्या दारी
मानव जन्माची पुन्हा घडो वारी
करतो पुन्हा हीच ईश्वरचरणी मागणी
असावी तुच माझी अर्धांगिनी

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी ता दौंड जि पुणे
+918600138525
nageshtipare@gmail.com

Friday 28 July 2017

मी माझी बहिण गमवली असती


सत्य घटना
(माझी बहिण वहान दुर्घटनेतुन वाचल्यानंतर)

*मी माझी बहीण गमवली असती*

काल दुपारी खुप आखरीत घडल असतं
त्यामुळं माझ सर्व घरदार रडलं असतं
काळाच्या ओघात जर वेळ दडली नसती
त्यात मी माझी बहीण गमवली असती

रक्षाबंधना दिवशी तुम्ही खाल्ला असता पेढा
मी मात्र झालो असतो रे वेडा
दिशा काही जर योग्य घडली नसती
तेव्हाच मी माझी बहीण गमवली असती

हातात नसता माझ्या आज राखीचा धागा
काळजाला पडल्या असत्या अगणित भेगा
मदतीला ती व्यक्ती धावली नसती
तर मी माझी बहीण गमवली असती

तुमच्या कपाळी तुम्ही लावले असते चंदन
आम्ही मात्र केले असते तिला शेवटचे वंदन
हे देवा जर तुझी पुण्याई प्रकटली नसती
तर मी माझी बहीण गमवली असती
*********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

Monday 3 July 2017

तीर्थक्षेत्राचे वास्तव: पावित्र व स्वच्छता

तीर्थक्षेत्राचे वास्ताव पावित्र आणि स्वच्छता

                     तस पाहायला गेलं तर आपल्या भारत देशात खुप सारे देव व तीर्थक्षत्र आहेत.  ज्या काळी आपल्या देशाची लोकसंख्या काही कोटीच्या आसपास असेल त्या आधी पासुन आपल्या देशात म्हणे 33 कोटी देव गाईच्या अंगात असतात. ज्या उद्देशाने हे पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण झाली किंवा निर्माण केली गेली याचा या आताच्या समाजाला काही उपयोग नाही. याचा उपयोग फक्त पिकनिक स्पॉट म्हणुन केला जाते.  प्रेमी जोडप्यांनी तर त्या पवित्र क्षेत्राची ची तर पार वाट लावुन टाकली आहे.  जे चार भिंतीच्या आत व्हायाला हवं ते हे आशा ठिकाणी करतात.  वरून बोलायला मोकऴे होतात की आमचं प्रेम राधा-कृष्णाच्या प्रेमा सारखं पवित्र आहे.  त्याचं हेच प्रेम फक्त वाढदिवसाला गिफ्ट घेतलं नाही म्हणुन क्षणात तुटलं जातं त्यांच हे पवित्र प्रेम.
             या पवित्र तीर्थक्षेत्रात स्वच्छता फार लयाला लावली आहे. दऱ्या खोऱ्यातुन वाहुन येणाऱ्या ज्या गंगा नदी चं पाणी पिल्यावर सगळी पाप धुवून जायची अस आजी आजोबा सांगायची त्याचं गंगेच्या आज काठावर ही जाऊ वाटतं नाही. आशी पावित्र तिर्थक्षेत्र आमच्या देशातात आहेत अनं आम्ही काय केलं या पावित्र्याचं हे पाहुन स्वता:ची लाज वाटते.  य़ाच खेड्यापाड्याची शहरांची सर्व घाण गंगे सारख्या पवित्र नदीत सोडली जाते. या पाण्यात पुर्वी शरीराला पोषक आशी खनिज द्रव्य असायची पण आता त्यात जीव-जंतु आढळतात.
          वारी, कुंभमेळा, यात्रा नैवद्य,  हळद कुंकु , प्राणबळी हे कृत्य केल्याने देव कधी पावणार नाही.  उलट त्याचा कोप होईल. मग घडते एखादी मांढरगढावरील घटने सारखी घटना.
           मग कधी कधी पडतो माझ्याच मनाला विचार,  हे धार्मिक तीर्थ क्षेत्र बनली असलतील तरी कशाला. मग याच्या मागचा हेतु तरी खरच साध्य होतोय का????  समजाला  याची खरच गरज आहे का आणि ती कशासाठी ??तीर्थक्षेत्र हे काही फक्त मनोरंजनाची ठिकाणे होऊ नयेत . त्याच्या स्वच्छेतेची, सुंदरतेची , पावित्र्याची निसर्गरम्य वातवराणाची एक अदर्श व्हावा.

मग मन प्रसंन्नतेसाठी ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी कसं, प्रसंन्न, वाटावं,  मग ते देऊळ असो या मशिद या चर्च.

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी ता.दौंड
जि. पुणे
8600138525

Friday 10 February 2017

स्वराज (सायली काव्य)

------सायली-----

........स्वराज्य.........

वर्षापुर्वी
धामधुमीच्या काळात
आम्ही परकीयांच्या अधीन
एकक्रांती घडली
महाराष्ट्रात

तेजस्वी
पुत्र जन्मला
शहाजी जिजाऊच्या पोटी
सुर्यास्थाच्या वेळेत
शिवनेरीत

मुघलांचा
जुलुम अत्याचार
नाही सहन झाला
शपथ घेतली
रायरेश्वरी

मावळ्यांसमावेत
लहान वयातच
जिंकुन एक किल्ला
बांधले तोरण
स्वराज्याचे

निमंत्रण
भेट आग्राची
अनर्थ एक घडला
नजर कैदेत
दरबारी

एकेदिवशी
पलायन केले
बसुन मिठाईच्या पेठाऱ्यात
शंभू ठेवले
ब्राम्हणाघरी

प्राण
गमवले तानाजीने
सिंहगड नाव पडले
इतिहास घडला
कोंडाणादारी

स्वराज्यावर
काळ लोटला
अफजल खान नावाचा
कोथला बाहेर
प्रतापगडी

विशाळगडकुच
पौर्णिमेच्या रात्रीला
रक्त वाहिले घोडखिंडत
धारातीर्थी पडले
बाजीप्रभु

स्वराज्यातील
प्रजा सुखासाठी
शिवाजी छत्रपती झाले
राज्यभिषेक संपन्न
राजगडावरती

विषबाधेच्या
अाजारी पणाचा
कहर असा झाला
देह ठेवला
राजाने

गाजवली
किर्ती पुत्राने
शंभु असा धर्मपंडित
नवा छत्रपती
स्वराज्याचा

घातपात
केला आपल्यांनीच
धर्मापायी प्राण सोडले
मस्तक उभे
तुळापरी

महान
पिता पुत्र
किती सांगु शौर्यगाथा
शब्द अपुरे
शेवटी
---------------------
.............✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे

Saturday 28 January 2017

मी

नाही समजनार मी
असा तरी सहजा सहज
दाटते कधी माझे ही मन
कधी फुटतो आश्रुंचा बांध
वाहता माझे ही आश्रु
पण एकांतात
भावना नाहीत मला
म्हाणतात असे काही जण
वाटते मग थोडे वाईट
माणुस आहे हो मी पण
तुमच्या सारखाच एक
आहेत मला ही भावना
जाणिव होते मला वेदनांची
मी काय दगड नाही
हळहळते माझे ही मन
मी एवढा कठोर ही नाही

नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
जि.पुणे
८६००१३८५२५

सायली १

प्रेम
करावं एकदा
मनातील त्या हृदयासाठी
नसाव हेवा
प्रेमासाठी

नागेश टिपरे
८६००१३८५२५

Tuesday 17 January 2017

तो, मी व वृद्धाश्राम


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अनुभव कथा
तो, मी व वृद्धाश्राम
➖➖➖➖➖➖➖➖➖
                त्या वेळस मी दुसऱ्या वर्षाच्या वाणिज्य शाखेची परीक्षा दिली होती. वय २० वर्षे होऊन सुद्धा माझ्यातला अल्लड पणा काही गेला नव्हता. परीक्षा संपताच आमचा क्रिकेट चा खेळ सुरू व्हायचा. त्या वेळेस मात्र थोडा बदल होऊन मी क्रिकेट मधे पंच म्हणुन कामगीरी करू लगलो होतो. पुर्वी या घटनेचा जास्त नाही पण थोडा फार अनुभव आला होता. पण s.y च्या वर्षी पंचाची भुमीका करणेच मला योग्य वाटु लागले.
                मज्जा अन मोबदला या दोन्ही गोष्टी मिळत असल्याने मी हा मार्ग पत्करला होता. त्या दिवशी मला जवळपास रात्री ९:३० च्या सुमारास कराड जवळील एका खेड्यातुन मला आयोजकांचा फोन आला. त्यांच्या शी बोलताना त्यांनी मला दोन दिवसांनी होणाऱ्या अंतिम सामन्याची कल्पना दिली अन मी त्या सामन्याचे पंच म्हणुन कामगीरी करावी असे अाव्हान केले. मी ही सहाजिकच हो म्हणालो. अन न राहुन मी त्यांना विचारलं अंतिम सामन्या साठी माझा सहकारी कोण आहे.
त्यांनी ही हसत हसत उत्तर दिलं तुमचा जुनाच सहकारी.
   मी अश्चर्याने विचारले सौरभ का?
आयोजक हो म्हणताच मी कॉल कट करण्याची घाई करत "काम आहे नंतर कॉल करतो" म्हणुन फोन कट केला. अन तेवढ्याच घाईत सौरभ ला कॉल केला. त्याला ही त्या सामन्या साठी त्याची  निवड झाली म्हणुन बातमी आधीच दिली गेली होती. पण मी त्याचा सहकारी हे समजल्यावर  तोही ह्या बातमी ने खुप आनंदी झाला होता. जवळपास दीड वर्षे दोघे ही एकच पंच म्हणुन काम करत असुन आम्हाला आज पर्यंत एकदा ही एकत्र काम करण्याची संधी मिळाली नव्हती.
                या धावपळीच्या जीवनात वेळे बरोबर चालने हे मला सौरभ ने शिकवलं होतं. त्याच गुणा मुळे आज ही कुठ्याल्याच ठिकाणी कमीत कमी तर माझ्या चुकी मुळे तर उशीर होत नाही. त्या दिवशी ठरल्या वेळे नुसार बारामतीतुन सकाळी कराड ची पहिली बस पकडायची याचे आम्ही नियोजन केले होते सामन्याची वेळ ही दुपारी ०३:०० ची होती.
                  मी ही शासकीय वसतीगृहातील रहात होतो. त्यामुळे जास्त नाही पण थोडीशी बंधने ही असायची. पण सर्वसाधारण पणे सर्वांची परीक्षा संपल्या मुळे बंधने तशी कमी झाली होती. मी ही वेळातच झोपी गेलो. करण दुसऱ्या दिवशी मला लवकर निघायच होतं. मी ४:१५ चा गरज लावुन झोपी गेलो.
                   सकाळी सकाळी गोड झोपेतच गजर वाजला. गजर बंद करून, मी या अंगावरून त्या अंगावर होत आळस देत तसाच १५ ते २० मिनिटं पडुन राहिलो. पडल्या पडल्या सौरभ ला फोन केला. पहिली रिंग वाजतेय की नाही तोपर्यंत त्याने फोन उचलला.
     मी उठलोय का पाहण्या साठी फोन केला ना? असा त्याने प्रश्न केला.
    मी नाही नाही म्हणालो. लवकर उरक सांगण्या साठी फोन केला म्हणत विनोदी प्रतीउत्तर दिलं.
                     माझं सर्व काही आवरून मी चौकातच चहा घेतला. बरोबर ०६:०० वाजता MIDC चौकात ०६:१५ च्या बसची वाट पाहु लागलो. रोज वापरात येणारा कॉलेज पास दाखवला. सकट मामांनी(कंडक्टर) नेहमी प्रमाणे पास पंचिंग करू का विचारलं. थोडंस स्मिथ हस्य करून
     करा करा आज नाही जाणार परत
म्हणालो
     का रे! कुठ दौरा निघालाय का,
     हो मामा
     कुठं
     कराड ला म्हणत मी पास खिश्यात घातला
         बोलता बोलता कधी तीन हात्ती चौक निघुन गेला हे समजलं सुद्धा नाही. मी स्टंड वर उतरून सौरभ ची वाट पाहु लागलो. बघता बघता एक तास निघुन गेला पण तो काय यायचा पत्ता दिसेना, म्हणुन मी त्या परत कॉल केला. पण आता कॉल ही बंद येत होता. मला वाटलं रेंज चा प्रोब्लेम असेल पण बरोबर ७:४५ च्या सुमारास त्याचा कॉल पहिल्यांदा बंद आला होता. त्या नंतर मी त्याची वाट पाहुच लागलो. एकट्याला काही करमणुक होईना म्हणुन मी राधाला कॉल केला. कॉल घेताच तीने मस्करी चालु केली.
     का रे आमची आठवण येत नाही का
     तस नाही गं
     मग कसं
     येते गं आठवण
     कुठं पर्यंत पोचलास
      बारामती स्टंडवरच आहे अजुन
      का.....?
      सौरभ नाही आला आजुन
      गप रे नको खोट बोलु
      खरचं गळ्या शपथ!
      तु काय कशाची पण शपथ घेशील
      मैत्री शपथ
      खरच म्हणतोस
      मग काय चेष्टा करतोय
      एकटाच आहेस
      हो म्हणुन तर कॉल केलाय
       थांब आलेच
       येताना रूद्रला पण घेऊन ये
      तो बाहेर गेला आहे
      बरं बरं मी बघतो कुठय तो
      मी तो पर्यंत रूद्राला कॉल केला. पण तो सकाळीच पुण्याला गेला होता. कसब्या पासुन बारामती स्टंड ला येण्याला पाच मिनीट ही पुरेसे आहेत. मी रूद्राचा कॉल ठेवतो का नाही तो पर्यंत राधा माझ्या पाशी पोहच झाली. तीला बोलत बोलतच मी पुन्हा सौरभ ला कॉल केला. पण तो पुन्हा बंदच येत होता. आता मात्र माझी चीडचीड होऊ लागली.
     "का रागवतोस त्याच्यावर" राधा म्हणाली
     ही काय वेळ झाली का यायची
     काय काम निघालं असेल
     पण काय ठरलं होतं आमचं
     हो पण.....
     काय तु पण त्याची बाजु घेतेस
    'तस नाही रे' पण तो वेळेचा खुप पाबंदी आहे
     हो मला ही माहीत आहे पण का येत नाही हे पण समजेनाय
      अरे तो तो आप्पानां भेटायला वृद्धाश्रामात गेला आसेल
     हो हो मी पहातो लगेच कॉल करून
     मी लगेच वृद्धाश्रामात कॉल केला.
कॉल करताच कॉल ही लागला, पण पहिल्यांदा कोणीच उचलला नाही. मी पुन्हा एकदा प्रयत्न केला. या वेळेस मात्र लगेच शिपाई काकांनी फोन उचलला.
    हॉलो... काका नागेश बोलतोय
    बोल ना भैय्या
    काका सौरभ आलाय का
   हो आलाय
    त्याला म्हणाव उशिर झालाय चल लवकर!!!
    भैय्या तो काय यायचा नाही बघ.....
    का हो काका?
    आप्पा जास्तच आजारी आहेत.
    का? काय झालंय त्यांना
    काय झालय तेच कळानाय
    दवाखान्यात नेलं होतं का
    हो... पण परत पाठवलं
    का......?
    जवळच्या माणसाना बोलवा म्हणाला डॉक्टर
    अनं हे तुम्ही आता सांगताय
    आप्पाच म्हणाले कुणाला काहीच नका सांगु
    मग सौरभ कसा काय आला
    अचानक आला भैय्या
    बरं बरं मी पण येतो तिकडं
                 तो पर्यंत राधाने घरची मोठी गाडी मागवुन घेतली व जाण्याची तयारी केली. बारामती स्टंड ते वृद्धाश्राम जास्तीत जास्त सव्वा तासाचा रस्ता. अनं एकदाची गाडी सुरू झाली. मला ही कधी जातोय असं झालं होतं. गाडीत बसल्या बसल्या मला आप्पांच्या काही आठवणी आठवु लागल्या.
               आप्पा..... आप्पा म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व होतं त्या गावतलं. लहाना पासुन थोरा पर्यंत प्रत्येकांच्या तोंडात दिनकर आप्पांच नाव असायचं. अनं ते ही आदराने घेतलं जायचं. पण एकुलत्या एक मुलाचं लग्न केलं, अनं मुलगा बायकोचा एवढा आधिन झाला की दावणी बैल तरी बरा. त्यामुळे आप्पांची व्यथा सुनेने फिरस्थी कुत्र्या पेक्षा काय वेगळी नव्हती. त्या वेळेस मात्र आप्पाना आत्मसन्मान आडवा आला आणि आप्पांनी सर्व धन दैलत सोडुन आंगावरील कपड्यानीशी घर सोडलं. ते थेट वृद्धाश्रामात आले.
                  सौरभ व त्यांची ओळख ही पण त्याचं दिवशी बस मध्ये झाली होती ज्या दिवशी आप्पांनी घर सोडलं होतं. सौरभ हा पण एक अनाथ होता. म्हणुन त्याला आप्पांची कहाणी काळज हेलावणारी वाटली. दिनकर रावंना आप्पा हे नाव पण सौरभनेच दिलं होतं. त्या दिवशी सौरभ ने आप्पाना मी दर आठवड्याला होस्टेल वरून सुट्टी काढुन भेटायला येत जाईल असं वचन दिलं. त्या वेळेस मात्र या गोष्टीची आप्पाना फक्त हे आपलं सांत्वन आहे असं वाटलं
                   वृद्धाश्रामात येऊन दोन-तीन दिवस गेले होते. पहिल्याच रविवार च्या दिवशी आप्पा सकाळच्या ऊन्हात बाकड्यावर बसुन कसला तरी विचार करत होते. एवढ्यात ज्या प्रमाणे सौरभ ने आप्पानां वचन दिल होतं त्या वचनाला ऋणबंद राहुन सौरभ वृद्धाश्रामात पोहचला व आश्रमाच्या गेट मधुन आत वळाला.
    नमस्कार आप्पा म्हणत त्याने आप्पांचे चरण स्पर्श केलं
    आ रे सौरभ. ये ये बस शब्दाला जागलास म्हणायचं
    तसं नाही आप्पा तुमच्यात मी माझ्या वडीलां बघीतलं. मी तर अनाथ, आई-वडील काय असतात हे तर माहीत नाही. जन्म कोणी दिला हे ही माहित नाही; म्हणुन थोडी जास्तच आपुलकी वाटली
   बर बर म्हणत आप्पांनी सौरभ च्या केसातुन हात कुरवाळत फिरवत होते. अनं थोडेे पाणावले डोळे पुसले.
     मला वाटलं शक्यतो त्यांना त्याच्या मुलाची आठवण आली असावी.
               गाडी चालु असताना मला हे सर्व काही सौरभ व आप्पांचा मी पाहिलेला प्रसंग मला आठवत होता. या तंद्रीत कधी वृद्धाश्राम आलं हे समजलं ही नाही. राधाने मला हालवुन जाग केलं.
   नागेश ऐ नागेश !!! आपण आलो वृद्धाश्रामत
   हो हो म्हणत मी गाडीतुन उतरलो
   तु पुढे हो मी गाडी लावुन येते म्हणत राधाने गाडी समोरील हिरव्यगार आंब्याच्या झाडाखाली लावली. मी उतरून समोर बघताच, समोर तर भकास भकास वातवरण वाटत होतं. आप्पा बसायचे ते बाकडे पण ओस पडल्या सारखे वाटु लागले. मला एकट्याल काय आत पावले टाकु वाटत नव्हती, म्हणुन मी राधाची वाट पाहु लागलो. राधा येताच आम्ही दोघ ही घाईतच तड तड पावले टाकत आत शिरलो. आत शिरताच आप्पा राहत्यात त्या खोली कडे वळालो. सर्वत्र भयान शांतता पसरली होती. शिपाई काका दरवाज्याच्या तोंडालाच आतुन उभा होते. तर आप्पांचे आश्रमातील मित्र हिरमुसलेल्या चेहऱ्याने त्यांच्या आवती भवती बसले होते. सौरभ आप्पांचा उजवा हात आपल्या हातात घेऊन त्यांच्या जवळ बसला होता. आम्ही येताच त्याने बसुनच फक्त एकदा एकटक नजर आमच्या कडे टाकली. मी व राधा ही आप्पांना झोपवलेल्या खाटेच्या दुसऱ्या बाजुला बसलो. आप्पानी ही सुकलेल्या डोळ्यानीच मला व राधाला जवळ बोलावलं. अनं बसक्या आवाजातच बरे आहात का विचारलं. आम्ही दोघांनी ही होकार्थी मान हालवली. थरथर कापणारा आप्पांनी त्याचा हात आमच्या दोघांच्या डोक्यावरून फिरवला.
    अनं म्हणाले "आज खरचं मी आनाथ किंवा वृद्धाश्रामात आहे असं मुळीच वाटतनाही." आता सुखाने तुम्ही आहात तोपर्यंत मरण आलं म्हणजे बरं झालं. म्हणत त्याचं हृदय भरून आलं
     'असं का बोलताय आप्पा'
      रडक्या आवाजातच सौरभ पुटपुटला.
      लेकरा या पेक्षा आजुन काय वेगळ सुख पाहिजे. असं मरण तर नशिबवान माणसाला येतं.
      पण आप्पा मला तुमची गरज आहे. नाही तर मी खरच आनाथ होईल.
      लेकरा एक ना एक दिवस या जगातुन प्रत्येकाला जायचंच आहे.
       तुम्ही बोलु नका आप्पा शांत पडुन रहा
       जस मला बस मध्ये तु एक वचन दिलं होतं तसं आज ही एक वचन दे सौरभ
      कोणतं आप्पा
      मी गेल्यावर ही तु या वृद्धाश्रामात पहिल्या सारखाच येत जा......
     हो आप्पा दिलं वचन मी येत जाईल
             सौरभ ने आप्पांचा हात हातात घेत आप्पांना वचन दिलं. वचन देताच एक स्मिथ हस्य केलं. अनं आप्पाच्या काळजात शेवटची तीव्र कळ निघाली.
      सौरभ....... म्हणत आप्पांनी सौरभचा हात आपल्या हातानी जोरदार पणे दाबला. अन त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
          आप्पा..... आप्पा...... नावाचा एकच आरडा ओरडा चालु झाला. सर्वच ढसढसुन रडत होते. रडत रडतच काका बाहेर पडुन त्यांनी अंतिम संस्काराची तयारी चालु केली. सौरभच ही मन गहिवरून आलं होतं, त्याने आजुन ही आप्पांचा हात सोडला नव्हता. डोळ्यातुन आश्रु गाळत होते पण त्याच्या तोंडातुन शब्द ही बाहेर पडत नव्हाता. मी माझी इच्छा नसतान ही नाईलाजाने त्यांच्या मुलाला दुसऱ्या कडुन निरोप पाठवला. अन तो निरोप ही त्याला काही क्षणातच मिळाला ही. दुपारचे सुमारे तीन वाजले असती. आनं आम्ही त्यांच्या मुलाची वाट पाहु लागलो. वाट पहाता पहाता सुर्य मावळतीकडे पुर्ण पणे झुकला. त्याची तीव्रता ही कमी झाली होती. शेवटी काही वृद्धाश्रामातील वृद्ध म्हणाले जो गेल्या आडीच वर्षात एकदा पण आला नाही तो आज तरी कशावरून येईल.
         शेवटी काका म्हणाले सौरभ तुच त्याच्या साठी सर्व काही होतास तुच पाणी पाज. उशीर करण्यास काही अर्थ नाही.
                    आम्ही तिघे व वृद्धाश्रामातील वृद्ध व जवळील काही जाणती माणसं सर्वसाधारण ५० जणानीच मिळुनच आप्पांची अंत्ययात्रा काढली. स्मशानभुमीत ही सर्व विधी उरकली व सौरभ च्या हातातत काकांनी पेटता डेंबा दिला.
    सौरभ मुख अग्नी दे.... सौरभ दे मुख अग्नी
                     थरथत्या हातांनी सौरभ ने आप्पांच्या सरणाला आग्नी दिली. सुर्य निम्मा मावळला ही होता. त्या वेळेस सुटणाऱ्या हावेच्या झुळकेने सरण धडधड पेटु लागले. काही वेळेतच धडडडडकीनी कवटी फुटल्याचा आवजा झाला. सर्व जण माघारी चालु लागले. अनं एकदाचा गप्प बसलेला सौरभ मात्र माझ्या गळ्यात पडुन ओक्सा बोक्शी काळीज फाटेल असा रडु लागला.
       आज एक अनाथ पुन्हा एकदा अनाथ झाला होता......
***********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
        जि.पुणे
मो.नं ८६००१३८५२५

Friday 6 January 2017

जातो आता घरी
आठवेल माझी परी
नाही येणार झोप तरी
पुन्हा पुन्हा आठवेल परी

नागेश

Monday 2 January 2017

चला व्यसनमुक्त होऊ

🌹🌹 *स्पर्धेला*🌹🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*चला व्यसनमुक्त होऊ*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

               व्यसन मुक्ती! व्यसन म्हणजे तरी काय. "शरीरास हानिकारक एखाद्या गोष्टीचा जास्त वापर म्हणजे व्यसन" ही सर्वसाधारण व्याख्या असावी. आजकाल प्रत्येकालाच *तंबाकु, दारू, गांजा, बीडी, सिगारेट* या आमली पदार्थांचे सेवन करताना दिसतात. एवढेच नाही तर *पेट्रोल, पाईपाचे सुलुचन* या तीव्र पदार्थांचे ही आजकाल ची तरूण पिढी फॉशन म्हणुन व्यसन करत आहेत.
           देशात या व्यसनाने एवढा धुमाकुळ घातलाय की प्रत्येक गावात असली व्यसन करत अनेक जन दिसतात. पण प्रत्येकाची व्यसनाची पद्धत मात्र वेगळी आहे. श्रीमंत *रम, व्हीस्की, ब्राँडी* या सारखे, मध्याम *नॉक आऊट, झिंगारो, किंगफिशर, ट्यांगो* हे तर गरीब मजुर हे मेरा भारत देश महान म्हणत *देशी, संत्रा हातभट्टी*यावर ताव मारतात. *३१ डिसेंबर, शिमगा, गणेश उत्सव, यात्र-जत्रा* हे जसे काय पिणाऱ्यांचे *सणच* आहेत. याच बरोबर सर्वसाधार किमतीत मिळणारे काही *गोवा, गुटका, विमल, स्टार RMD* यांचे व्यसन करणारी संख्या जरा जास्तच पहायला भेटती. याचे सेवन करण्यासाठी कुठल्या ही सणावाराची आवश्यकता नाही. थोडक्यात सांगायच झालं तर *दिवसरात्र काबाड कष्ट करणारा मजूर हा त्याच्या ऐपतीप्रमाणे देसी गुत्या वर जाऊन दारू पितो , मध्यम वर्गी तर काही पार्टी, तर पैश्याचा उत्तम स्त्रोत असलेला वक्ती थंड हवेत बसून इंग्रजी मद्य पितो . या सर्वांची गुलामगिरी हि सारख्याच दर्जाची*                    
                  प्रत्येक गल्लीत रोज एक तरी फुल टु टल्ली होऊन पडलेला दिसतो. पण या व्यसनानेच *आधी हिंसाचार मग अत्याचार नंतर होतो गुन्हेगार सर्वात शेवटी व्हाव लागतं लाचार*
               काही दिवसा पुर्वी सरकार ने *गुटका* बंदीचा निमय काढला होता. पण तोच नियम आता ढाब्यावर बसलेले दिसत आहेत. काही गुटका कंपनी ने तर शेरास सव्वा शेर म्हणुन तर काय *दोन वेगवेगळ्या पुडी ची निर्मीती केली ते कायदेशीर होते, व ग्राहकांना सुचना केली की त्या दोन पुड्या एकत्र केल्या की गुटका बनतो* सर्व महाराष्ट्रात ही पद्धत आज ही बघायला मिळते.

कधी काळी म्हणे या देशातुन सोन्याचा धुर निघत होता ते पहायाल मी नव्हतो पण आज त्याच देशात मलेल्यांच्या सरणाचा रोज धुर निघतो.

*राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा*
*नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा*
*मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा*
*प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा*
             हे बोल तर कुठे विरले आहे ते तर माहितच नाही. लहान पासुन थोरा पर्यंत जण या व्यसनाच्या आधिन झाला आहे. यात आजची युवा पिढी ही खुप गुंतलेली आहे. या धावपळीच्या जीवनात कोण काही ही व्यसन करण्याची कारणे सांगतो. *कोण एकतर्फी प्रेमात, कोण जामिनीच्या भांडणामुळे, कोण अॉफिस मधला थकवा घालवण्या साठी, कोण टेन्शन आहे म्हणुन, कोण म्हणते मित्रा मुळे पिलो, तर कोण म्हणतो सवयच लागली आहे* तर काही तर हद्दच पार करण्या सारखी कारणे सांगतात *म्हणतात कशी "भाऊ ही तर स्टाईल आहे"*
            या व्यसना मुळे एवढा दुष्परीणाम वाढले आहेत की सांगायलाच नको. *एवढेच नाही तर व्यसना मुळे मुलाने वडिलाच्या प्रेताला अग्नी द्याचे सोडुन बापच कठोर काळजाने मुलाच्या प्रेताला अग्नी देताना वारंवार दिसत आहे*
या व्यसना मुळे तरूण पिढी ची संख्या भविष्यात खुप कमी होऊ शकते.
*शहरी प्रदूषण खेड्यात केव्हा स्थिर झाले कळलेच नाही.*

दारूवर एक छोटी शी रचना

*दारू प्याला*

आज एक माणुस
दुनिया सोडुन गेला
काल पासुन तो
खुप खुप दारू प्याला

त्याच्या जाण्याने आज पुन्हा
एक बछडा अनाथ झाला
घरावरून जणु काळ फिरून गेला
कारण तो काल खुप दारू प्याला

धरा,आंघोल घाला
सर्वांचा एकच गोंधळ झाला
कुणीतरी याच्या पावण्याला
निरोप धाडा
म्हाव तो सकाळ सकाळ मेला
कारण तो खुप दारू प्याला

जाणता माणुस म्हणाला
जीत्यापणी नाही मेल्यावर तर धर्म पाळा
कुणीतरी याच्या तोंडात तुळशीचा पाला घाला
तो गेला कारण तो खुप दारू प्याला

बायकोच्या अक्रोषाने क्षणभर
गावकऱ्यांचा खोळंबा झाला
निम्या आयुष्यात तो तीरडी वर गेला
कारण तो काल खुप दारू प्याला

गावात एक चर्चेचा विषय झाला
काही म्हणाले बरं झालं मेला
तो पर्यंत सरणाचा धुर सुरू झाला
तो काल खुप खुप दारू प्याला
******************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
http://nageshtipare.blogspot.in