Tuesday 4 October 2016

माझी गाय

माझी गाय

पोटात भुकेचा ऊठता डोंब,
त्या वासरचा हंबरडा फुटला.
अनं मेलेल्या गाईला पाहुन,
जीव माझा तीळ तीळ तुटला.

खुप तरफडली ती,
पोटात पडली आग.
गाय माझी गेली,
राहीला मागे तो माग.

शेवटी न्हेताना तिला,
थरथरला माझा हात.
खुप केली होती दवा,
पण नशिबाने सोडली साथ.

पुरून तिला आलो,
पण तुटली नव्हती माया.
रिकाम्या दावणी कडे पहातां,
खचली माझी काया.

पुन्हा एकदा त्या वासराचा,
आकांताने हंबरडा फुटला.
मिठी त्याला घेता;
आश्रु वरचा ताबा मात्र सुटला......
आश्रु वरचा ताबा मात्र सुटला......

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५