चल ना
आपुन साळात जावु
लय लय शिकु
मोठ मोठ होवु
बाप नाय तुला
बाप नाय मला
दुख याच आता
सांगतु तरी कुणाला
चल ना
आपुन साळात जावु
साळत म्हणत्यात
लय आसती मज्या
मास्तर भी देतोय
कधी कधी सज्या
तरी पण
आपुन साळात जावु
दप्ताराच ओझ
आन कागदावर लीहु
पैस नाय म्हनुन
चार बुक कमी घीवु
चल ना
आपुन साळात जावु
साळा सुटल्यावर
मिळल ते काम करू
पाणी भरू, धुणीभांडी करू
दिल्याली भाकरी खाुु
चल ना
आपुन शाळात जावु
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
No comments:
Post a Comment