जाणवेना आम्हाला स्वातंत्र्याचे बलिदान
गाणी गातात मात्र सर्व
आमाचा भारत देश महान
आमाचा भारत देश महान
तुमची आमची नीती फिरली
समाजातील भिती विरली
ते सुद्धा हातात तिरंगा घेतात गाणी गातात
आमाचा भारत देश महान
आमाचा भारत देश महान
क्रांतीकारक लढतो आहे, मरतो आहे
घरदार त्याचे त्याच्या मागे रडते आहे
तीच विधवा मुलालाही पुन्हा क्रांतीकारक बनवत आहे
महानतेच्या किर्तीचे गाणे
ती आज पण गात
आमाचा भारत देश महान
आमाचा भारत देश महान
स्वातंत्रदिनाला तिरंग्याची दोरी
खादी टोपी वाला खुलवत आहे
सलाम करून त्या तिरंग्याला
राष्टगीत तो गात आहे
आमाचा भारत देश महान
आमाचा भारत देश महान
काही घटना काळजाला रुतत आहे
सांगुन सांगुन रक्त माझ आटत आहे
म्हणुनच स्वातंत्र च्या गीताला भित आहे
तेच गीत मुखात आहे
आमाचा भारत देश महान
आमाचा भारत देश महान
****************
 नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
 
No comments:
Post a Comment