भावासाठी भाऊ जीव देत होता
भावाचा जीव भाऊ घेत पण होता
धन-दौलतीचा मांडव उभा केला जात होता
हे ही पाहिलं कलीयुग असताना
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
कधी कुणाकडुन इथे आब्रु ही वाचवली जात होती
आब्रु लुटणाय्रांची बीजे ही इथेच पेरली जात होती
त्यांची मात्र समाज पुजा करीत होता
आम्ही ही लाचार झालो होतो
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
माणुसकी नावच एक गाव आजही जपलं होतं
जाती-धर्माच भांडण पण इथेच लावल जात होतं
यालाच लोकशाहीने राजकारण असं म्हंटल होतं
नाव मिळवण्यासाठी हे ही इथ चालत होतं
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
मित्र मित्राला अतुट आशी साथ देत होता
समाज त्यामध्ये ही आता फुट पाडु पाहतं होता
आक्रोश आज ही इथे सुरूच होता
हे सुध्दा पहावं लागल
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
समाजा सारखा समाज राहीला नव्हता
आपमतलोभी पणाचा चटका लागला होता
विश्वासाला पण तडा दिला जात होता
म्हणुन पुढे येण्यास कोणीच धजावत नव्हता
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
खचलेला मदतीचा हात मागत होता
आत्महात्यास कारणीभुत हाच समाज होता
पिताच मुलाच्या प्रेताला आग्नी देत होता
आता आश्रु सुध्दा वाहु लागले होते
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
No comments:
Post a Comment