Sunday, 11 September 2016

नाती तुटताना.....

नागेश टिपरे लिहितोय.....
      नाती तुटताना....
            सुर्य उगवुन कासरा भर वर चढला होता. राजु आजुन ही झोपेतच मरगळत होता. आईने दहा-बारा हाका मारल्या नंतर त्याने हात पाय तानत गोधडी सोडली अन पडवीत येऊन बसला. तो बसतो का नाही तो पर्यंत त्याच्या म्हतारीने तोंडाचा पट्टा चालु केला. राजु सर्व काही शांत पणे ऐकुन घेत होता त्याला याची जणु काय सवयच लागली होती. म्हतारीची बरीच बडबड करून झाल्या नंतर त्याची आई शारदा त्याला म्हणाली
    "दत्तु आला व्हता तुच्याकडं; जाऊनंशानी बघ पोर काय म्हणतयं ते" यावर राजु ने बसल्या जागी मन डोलावली.
     तसे पाहीले तर दत्तु हा गणपतराव व बकुळाचा एकुलता एक पोरगा. शाळेमध्ये तो हुशार होता, गरीबी आसताना ही मॉट्रिक ची परीक्षा दिली होती. दुसरी गोष्ट म्हणजे दत्तु अन राजुची दोस्ती गावभर प्रसिद्ध; कधी ही त्याच्या दोस्तीत फुट पडली नाही अन पडायची पण नाही आशी काही गावभरातील म्हतारी-क्होतारी ग्वाही द्यायचे.  यात तीळमात्र शंका नव्हती. गावभर यांची दोस्ती तोडण्यासाठी पैंजावर पैंजा लागायच्या त्यात आता पर्यंत कोणी ही यशस्वी झाले नव्हते. त्याचा परीणाम त्या दोघांवर कधी ही दिसला नाही. पुढे दोघांचा मॉट्रिक चा निकाल झाला, दोघेही चांगल्या गुणांनी पास झाले होते. याच्या खुषीत पाटलांनी गावभर पेढे वाटले, राजु हा पाटलाचा तर दत्तु पाटलाच्या शेतावर काम करणाय्रा गड्याचा पोर. तस पाहीलं तर गणपतरावची परिस्थिती जेमतेमच होती. पाटलांच्या सांगण्यावरून दत्तु ला पण राजु बरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायाला गणपतरावाला  सांगीतलं. पाटलांनी तशी दोघांची सोय ही केली होती.
          पाटला मुळे दत्तुच पण शिक्षण चालु राहिलं होत. दोघे ही नविन ठिकाणी रमत होते, हळुहळु त्यांच्या मैत्री ची खबर सर्व महाविद्यालयाला कळु लागली. कॉलेज चे ते दिवस असेच सरत होते. या दिवसात त्याची ओळख त्याच्या वर्गातील नंदिनी शी झाली. नंदिनी दिसायला सुंदर होती.
तशी तर ती सडपातळ बांध्याची, त्यात तिने घातलेल्या गुलाबी ड्रेस मध्ये ती अधिकच उठुन दिसायची. दोन भुवयांच्या मधोमध लावलेली ती नाजुकशी टिकली अनं डाव्या गालावर येणारी ती केसांची बट्ट. या सौंदर्यात जणु स्वर्गातुन परीच धरतीवर उतरावी आसा तीचा भासत होत होती. तीची मैत्रीण म्हणे तिचा बाप बँकेत साहेब आहे. दत्तु व राजु ची नंदिनीशी हळुहळु मैत्री वाढु लागली होती अनं तीला ते दोघे आपले सर्वात जवळचे मित्र वाटु लागले होते. काही दिवस आशेच गेले अनं त्या काळात नंदिनी ला दत्तु बद्दल थोडं जास्तच आकर्षण वाढु लागलं होतं. इकडे दत्तु ची पण अवस्था नंदिनी सारखीच झाली होती. एके संध्याकाळी चहाच्या टपरीवर चहा घेत असताना दत्तु चिंत्ता ग्रस्त वाटत होता म्हणुन राजु ने त्याला त्याच कारण विचारले. काय सांगव, कसं सांगाव या द्विधा आवस्थेत पडला.
राजुने जोर दिल्याने तो चाचपरत बोलला
"मला नंदिनी खुप आवडती यार राजु"
त्याच्या या बोलण्याने त्याचा ही चेहरा खुलला.
'मला प्रेम झालेल पाहुन जगात सर्वात जास्त आनंद कोणाला होईल तो राजुला' असे दत्तु वाटत असे; अनं का वाटु नये. त्याने जसा विचार केला होता त्या पेक्षा जास्त आनंद राजुला झाला होता. तो स्पष्ट पणे राजु च्या चेहय्रावर जाणवत होता. हातातील चहा कधी संपला ते त्या कळले सुध्दा नाही, दोघे रमत गमत आता घराची पावले चालु लागले. नंदिनीला नंदिनी म्हणण्या ऐवजी वहिणी वहिणी म्हणु चिडवु लागला. त्याच्या त्या बोलण्याने दत्तु पण थोडा भावनीक झाला. दोघांची स्वारी आता घरी पोहचली पण हुल्लंड पणा काही गेलेला नव्हता. रात्री बोलण्यास त्यांना एक नविन विषय मिळाला होता.
     तिकडे नंदिनी ही प्रत्येक गोष्टी साठी दत्तु च्या नावाचा जप करत आसायाची, कधी कधी झोपेत पण त्याच्याच नावाने चावळायची. दिवसा मागे दिवस जात होते अनं दोघेही एकमेकांना आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यास भीत होते. एके दिवशी दुपारच्या वेळेला या तिघांची स्वारी कॉलेज कॉंटिन मध्ये बसली होती. चहाची ऑर्डर देण्यासाठी राजु आत गेला होता अनं बाहेर दत्तु नंदिनी कडे एकटक पहात होता विचार करत होता
एक ऊमलावी कळी
नभातुन कोसाळाव्यात सरी
चिंब भिजावी मनाच्या तरी
त्यात दिसावी माझी परी
यातच राजु च्या येण्याच्या चाहुलीने दत्तु भानावर आला. दत्तुची ती नजरेची भावना नंदिनी ने कधीच ओळखली होती. चहाचा कर्यक्रम उरकुन राजुने आपला काढता पाय घेतला व त्या दोघांना थोडी मोकळीक करून दिली. राजुच्या जाण्याच कारण नंदिनी ला ओळखु आल होतं. हाजारोंच्या पट्टीत विद्यार्थ्याच्या समोर बोलनारा दत्तु आज मात्र आडखळत होता. तो दिवस ही तसाच गेला पण तो नंदिनी ला बोलण्यासाठी हिमंत जुटवु शकला नव्हता.
            दिवस हळुहळु मावळतीकडे झुकु लागला नंदिनी चा निरोप घेऊन राजु व दत्तु घराकडे चालु लागली. नंदिनी ला आपण विचारण्याची हिमंत करू शकलो नाही याची नाराजी साफ साफ दत्तु च्या चेहय्रावर पाहुन विषयंतर करून बोलु लागला. नविन विषयावर दोघांची चर्चा सुरू झाली. त्या रात्री राजु ने त्याला खुप समजावलं नंदिनी ला प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यासाठी त्यानी एका दिवसाची निवड केली.
       आखेर ज्या दिवसाची ते दोघे ही आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडला. दोघांनी पटापटा उरकले आणि कॉलेज ची वाट चालु लागले. दत्तुच्या तोंडावर एक वेगळ्याच प्रकारच भितीच सावट दिसत होतं. यातच दोघे शेवटच्या बाकावर बसले. मनात नाना प्रकारचे विचार येत होते. वाय्राची झुळुक यावी अनं निघुन जावी तशी कॉलेज ची वेळ निघुन गेली. कॉलेज सुटले प्रत्येक जण वर्गाच्या बाहेर पडत होता. दत्तु अजुन शेवटच्या बाकावर बसुन राहिला होता. हे पाहुन साहजीकच नंदिनी ही मागे रेंगाळु लागली. दत्तु च्या शेजारी राजु ही आजुन तसाच बसलेला होता. हळुहळु सर्व वर्ग पुर्णपणे रीकामा झाला. सर्वात शेवटी राजु ही वर्गाच्या बाहेर पडु लागला. जाताना हळुच तो दत्तु च्या कानात पुटपुटला
"आज तु वहिणीला विचारलेच पाहिजे नाही विचारणार तर तुला आपल्या मैत्रीची शपथ"
असे बोलुन तो जीना उतरू लागला. त्याचा जीना उतरताना होणारा आवाज दत्तुच्या काळजावर घाव करीत होता, हळुहळु जीन्यातुन येणारा आवाज मंदावत गेला. काही क्षण राजुच्या त्या बोलण्याने दत्तुचे डोळे पाण्याने डबाबले. राजु निघुन जाऊन बरीच वेळ झाली होती. एकांत पाहुन नंदिनी त्याच्या जवळ येऊन बसली व म्हणाली
काय रे! काय झालं; डोळे का पाणावलेत तुझे.
काही नाही गं, असचं.
म्हणुन त्याने डोळे पुसले.
त्याच्या मनावर आता एक प्रकारच दडपण होतं कारण राजुची शपथ क्षणा-क्षणाला आठवण करून देत होती. काही वेळ गेला त्या दोघांच्या गप्पा रंगु लागल्या. वेळ ही भरभर निघुन चालली होती. सुर्याची तीव्र किरणे हळुहळु मंद होऊ लागली. दत्तु आद्याप  मुख्य विषयाला हात घातला नव्हता. नंदिनी घरी निघण्याची तयारी करू दरवाज्यापाशी आली होती. आशातच दत्तु ने पुन्हा तीली आवाज दिला.
नंदिनी....
सावकाश पावलांनी ती जवळ येऊ लागली, ती जवळ येताच दत्तुने आपल्या मनातला भाव टाकला
    नंदिनी!!!!
    बोल ना; का रे
    रागवणार नसशील तर एक बोलु
    हो बोल ना
    नाही, पण.....
    पण बीन जाऊ दे! बोल
    तु मला .....
    काय? तु मला
    तु मला खुप आवडतीस, मी प्रेम करू लागलोय तुझ्यावर!!!
दत्तुच्या या बोलण्याने ती थोडीशी लाजली, तीला काय बोलाले ते ही कळना.
      छे! ऱे!! नको हे(लाजुन)
म्हणुन तीने पाठ फिरवली
दत्तुने तोपर्यंत तीचा हात पकडला होता.
त्याच्या हातातुन हात मोकळा करून ती पळतच दारात पोहचली, मनातील आनंदाने ती हर्षीत झाली होती. दरवाज्यात क्षणभर थांबुन लाजुन तीने होकार्थी इशारा केला, पळतच जीणा उतरू लागली.
      नंदिनी, नंदिनी! थांब ना!
मागुन दत्तुने आवाज दिला;  पण ती काही थांबली नाही.
नंदिनी पळत जाताना पाहुन खाली उभा आसलेल्या राजुच्या मनात शंकेच वावटंळ उठु लागलं. तो पळतच दत्तु कडे धावला त्यांची भेट जीण्यामधेच झाली. राजुला बघताच दत्तुने त्याला मिठी मारली, प्रेमाने त्याचे डोळे भरून आले होते. इकडे राजुच्या मनाची घालमेळ आजुन सुरूच होती.
दत्तुचा चेहरा दोन हातात धरून राजु बोलला.
     दत्तु! ये दत्तु! काय झाल....काय म्हणाली नंदिनी
दत्तुने पुन्हा एकदा राजुला मिठी मारली.
हो म्हणाली यार! नंदिनी हो म्हणाली
दत्तुचे हे शब्द ऐकताच पुन्हा एकदा दोन यार ऐकमेकांच्या मिठीत बिलगली. घरी जाण्यस आज त्यांना बरीच वेळ झाली.
                 हसी- मचाक मध्ये काही दिवस निघुन गेले, दिवाळी लोटली. दत्तुला जमेल तेवढा वेळ दोघांबरोबर घालवण्याचा प्रयत्न करायचा.
त्याच्या प्रेमात राजु जेवढा हक्कदार होता तेवढीच नंदिनी ही होती; हे त्याला कळुन चुकले होते, त्या सत्या पासुन तो पाठ फिरवु शकत नव्हता. कधी तो राजु बरोबर असेल तर नंदिनीनीला वाईट वाटु लागायचे, तर कधी नंदिनी बरोबर असेल तर इकडे राजुला त्याच्या कमतरतेची जाणिव व्हायची; अनं तो कधी भावनाधीन व्हायचा तर कधी कधी त्याला रडु ही कोसळायचे. जशी जशी नंदिनी त्याच्या जवळ येत गेली तसातसा मी त्याला दुरावत गेलो या गैरसमजात राजु राहु लागला. या दोघांच्या मनाची जाणिव दत्तुला पण होऊ लागली, अनं यांच्या विचाराने तो तीळतीळ तुटु लागला व रात्र रात्र जागु लागला.
          राजु कधी एकटा दिसला की इतर मित्र-मैत्रिणी त्याला समजुन सांगायचे पण त्याने राजु काही समाधानी होत नसायचा. पण ज्या दिवशी तिघे ही एकत्र बसायचे, फिरायचे, गप्पा मारायचे त्या दिवशी सगळ्यात आंनदी होत आसेल ती व्यक्ती म्हणजे दत्तु असायचा. आपला मित्र, आपलं प्रेम, आपल्या बरोबर आहे या गोष्टीने तो आधिकच समाधानी व्हायचा. त्याच्या या हासण्यात, रूसण्यात व भांडनात हिवाळ्याचे चार महिने कसे निघुन गेले हे त्यांना कळले नाही.
           पण जशी जशी उन्हाची तीव्रता वाढु लागली तसातसा राजु व नंदिनी यांच्या  मधला दत्तु साठी होणारा तणाव वाढतच गेला. दत्तु काही कामासाठी बाहेर गेला असेल तर नंदिनीला वाटे आपल्या पेक्षा त्याला राजु प्रिय आहे व राजुला वाटे त्याला फक्त नंदिनीच आवडते. परत दत्तुने किती वेळा तरी समजवण्याचा प्रयत्न केला तरी दोघे ही एकुन घेण्यास तयार नसायचे. राजु व दत्तु मध्ये अंतर पडु लागले होते, याला संपुर्ण जबाबदार ही नंदिनी आहे या गोष्टी वर राजु ठाम होता. यांच्याच कॉलेज मधली काही उर्मट पोरं याचा फायदा घेत होती, व त्याच्या मैत्री मध्ये अंतर पाडत होते.
        वार्षिक परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्या होत्या, प्रत्येक जन आपआपल्या अभ्यासात मग्न झाले होते. काही काळापुर्वी तिघांच्या मैत्रीत आसणाय्रा एकोप्याचा मात्र समद्विभुज त्रिकोन झाला होता. परीक्षा ही संपली, दत्तुने शेवटच्या दिवशी दोघांना एकत्र बोलावले. या दोघांच्यात सामंज्यस्य आणण्यात दत्तु पहिल्यांदाच आपयशी ठरला होता. शेवटी नंदिनी ने आपल्या मनातील मनसुभा बोलवुन दाखवला.
        "तुला राजु हवा असेल तर तु मला विसरून जा नाहीतर तु माझ्यासाठी राजुला विसर"
तिच्या या बोलण्याने तो पुरता कोसळला होता. तो पर्यंत नंदिनी निघुन ही गेली होती. दत्तु व राजु आता घराकडे निघाले, रकरकत्या उन्हात दोघे ही घरी पोहचले, सुर्य ही ढळुन गेला, रात्रीच जेवन सुध्दा झाल पण कोणीही काही बोलत नव्हते.
            दुसरा दिवस उजाडला, दत्तुच्या जीवाचा होणारा आटापीटा राजुला आता बघवत नव्हता, त्यातच त्याली कालचे ते नंदिनीचे शब्द आठवले. दत्तुच्या प्रेमासाठी आपण दत्तुच्या आयुष्यातुन निघुन जावे असे राजुला वाटु लागले. राजु दत्तुला घेऊन बस स्टॉंड जवळील  वळणावर आला, सुर्याच्या तळपत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत होती. तेवढ्यात नंदिनी ही आली. तिघे ही अनओळखी माणसा सारखे एकमेंकाडे पाहत होते, शेवटी काळजावर दगड ठेऊन राजु बोलु लागला.
           मला महित आहे माझं चुकलं आहे; मी तुमची माफी ही मागु शकत नाही, मी तुमच्या खाजगी आयुष्यात येण्यास नको होतं. हे बोलताना राजुच मन भरून आलं हे नंदिनीला स्पष्ट पणे जाणवले होते. शेवटी तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे म्हणुन त्याने दत्तुला मिठी मारली. क्षणातच तो भानावर आला अनं बाजुला सरला न डबाबलेले डोळे पुसत, काही न बोलताच निघाला. नंदिनीनीला ही आपल्या चुकीचा चांगलाच पश्चाताप होऊ लागला. राजु व दत्तुच्या मैत्री तुटण्याला ती स्वतःला जबाबदार धरू लागली. ती दत्तुकडे एकटक बघत होती, डोळ्यातुन आपआपच धारा वाहु लागल्या. नंदिनी काहीच बोलली नव्हती पण तीच्या सर्व भावना दत्तुला उमजल्या होत्या. नंदिनी ही तशीच निघुन गेली.
दत्तु आता दुरवर दोन वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता. आपण पोरके झालेल्या भावनेने दत्तुच्या डोळ्यातुन आश्रु वाहु लागले होते. चैत्र महिन्याच्या त्या उन्हात आसु विरून गेल्याने त्याची जाणिव सुध्दा होत नव्हती....
    
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

No comments:

Post a Comment