Thursday, 15 September 2016

मित्रा

आठवतात मला साऱ्या खुणा
तुझ्या शिवाय आहे मी सुना
ये मित्रा येशिल का पुन्हा

दुसऱ्यांच्या सांगण्यावरून
जगन झाल आपल कडु
आपल्या दोस्तीचा देठ कसा वाटला रे खोडु

पुन्हा खेळ मांडु
पण पुन्हा नको भांडु
खेळ हा ह्रदयाचा नको मोडु

तुझी माझी होती एकच वाट
त्याच वाटेवर मांडु आपला थाट
त्या तुझी हवी मला साथ

मैत्रीची आपल्या वेगळी असावी रीत
दाखवु जगाला तुझी माझी प्रीत

शब्दांबरोबर नको असा रडु
चुकलोय मी म्हणुन नको रे दडु

तुझ्या बरोबर जगण नाही
ते का जीवन व्हाव
नसेल तुला मान्य
मग जीवन का जगाव
तुझ़्या आधी मरण तरी याव

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

No comments:

Post a Comment