तिच्या माझ्या प्रेमाची
आज पुन्हा झाली चर्चा
त्या साठी निघणार होता
एक महाकाय मोर्चा
मोर्चाचा सुत्रधार बसला होता आत
विषय त्याने काढला होता जात
वार, वेळ, तारीख फिक्स झाली
त्यातच एका गुप्तहेराची स्वारी आली
निरोप होता असा
झालेला प्रकार त्याच्या समोर मांड
सांग प्रकरण झालंय खुप दांड
आखला गेला आहे डाव
करतील तुझ्यावर घाव
त्यावेळी तुज पाशी कोणी नसेल
तोच त्यांचा योग्य काळ असेल
त्याला म्हणाव घे तु मिटिंग
नाही तर बिघड तुझी सेटिंग
निरोपाने माझ्या जीवात जीव आला
त्यासाठी मी एक प्लान तयार केला
धडाक्यातच मी सुत्र हालवली
महत्वाची व्यक्तीच पळवली
काही क्षणाताच तो उध्वस्त केला
परत एकदा मोर्चाचा फेल गेला
विझली होती मोर्चाची आग
पण गेला नव्हता मनाती कुणाच्या राग
दुर दुर उभे राहुन
हे सर्व ती पुन्हा गेली पाहुन
प्रेम माझ आहे तुझ्यावर
हे सांगायचे गेले परत एकदा राहुन
........✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
http://nageshtipare.blogspot.in
No comments:
Post a Comment