Monday 26 December 2016

व्यथा

😔😔*व्यथा*😔😔

आज जरा
वेगळच स्वरूप आलं
म्हणतात ना जस
एकदाचं घोडं गंगेत न्हालं
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
विसरले सर्व मानाच्या व्यथा
बोलुन तोलुन झाले असेल तर
मार दोन पाठीत लाथा
फुटेल तरी एखदाच माथा
नाही घडनार मग कुठलीच कथा
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
बदलले रे सर्व
छोट्याश्या या काळात
कळाले मात्र आजही
मी तुमचा कधीचाच नाही
बदलुद्या दुनिया सारी
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
मनातील शब्द ओठावर आले
लेखणी मग म्हणते कशी
आरे मी ते कधीच
कागदावर लिहाले
कागद ही म्हणाला मी तुझा नाही
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
नाही नाही
चुकते आहे लेखणी
ती लेखणीच माझी नाही
*मग कोण कुणा सारख नाही*
*मी तुमच्या सारखा नाही*
*तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
*मग लेखणी ही सत्या शिवाय चालत नाही*

नागेश टिपरे
८६००१३८५२५

गावचा नदीकाठ

गावचा नदीकाठ

गावतील नदी किनारी
एक झाडं होत वाकड
कधी खेळायची पोरसोरं
कधी खिदळायची माकडं

सळसळ घालतो वारा पिंगा
मग पाने फुले पातीला फुटतो हर्ष
कोण जाणे त्याच्या मनी काय दंगा
एक वेल घेतो जेव्हा पाण्याचा स्पर्ष

हिरवी गार गवताची पानं
झुळझुळ वाहतयं पाणी
झुकल्या फांदीचाच झुला
त्यावर खेळतीय माझी तानी

वहात्या पाण्याचा च हा मेळ
त्यात दिसतय आपलच चित्र
वर बसुन पहात आहे एक खेळ
कोण शोधततय मासाच म्हणुन मित्र

कडे फुलली जाभळी ही रान फुल
दरवळतोय कस्तुरी मोहक सुगंध
आठवतोय मला आजही तोच नदीकाठ
मन होतय माझं मग आज, धुंद बेधुंद
.............✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे
nageshtipare.blogspot.com

Saturday 10 December 2016

धक धकता हे काळीज
हात जातोय छातीवरी
माझंच मन मला विचारतं
आठवतेय मग तुला परी

नागेश टिपरे

मित्र ( मित्रा विषय मन बोललं तेव्हा )


नाही बदलला तो तु थोडा बदलशील का;
समज नाही त्याच्यात तु त्याला समजावशील का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

चुकला असेल तो तु पण हीच चुक करनार का;
आहे तो वेडा माफी या वेड्याला करशील का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

कदाचित गुन्हेगार असेल तो तुझा तु पण हाच गुन्हा करनार का;
गरज आहे त्याला मैत्रीची परत मैत्री करनार का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

त्याने तोडली होती नाती तु पण नाती तोडनार का;
आज ही तो एकटाच आहे साथ त्याला तु देशिल का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

दुश्मन नही मित्र आहे तुझा मित्र म्हणुन राहणार का;
मैत्री या शब्दाला तु पण कलंक लावणार का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?
                            नागेश शेषराव टिपरे
                          मो.नं:- ८६००१३८५२५
                            मु.पो:-खडकी ता.दौंड
                                     जि.पुणे

Wednesday 7 December 2016

स्पर्धेला

मिळतो आहे समान न्याय
मिटल्या त्या जातीय सीमा
लिहिली तु राज्य घटना
थोर तुझे उपकार भिमा

नागेश टिपरे

आकस्मिक चारोळी स्पर्धेला
*********************
जेव्हा जेव्हा फुटतो ७/१२ हा
जीवा जीवा वरच उठतो ७/१२ हा
रक्ता रक्ताच वैर करतो ७/१२ हा
माती बरोबर तोडतो नाती ७/१२ हा
******************
नागेश टिपरे ९१

Sunday 4 December 2016

चला विषमता नष्ट करू

💐💐 *वैचारिक लेखमाला*💐💐

🌹 *चला विषमता नष्ट करू*🌹
------------------------------------------
           *विषमता !* विषमता म्हंटल की काळज खोलवर चीरत जाते. विषमता हा शब्द जरी सम अक्षरांचा असला तरी याचा गुणधर्म मात्र गाणिती भाषेला साजेल असा आहे. विषमता ही तर या सृष्टीत पुर्वी पासुन चालत आली आहे. पुर्वी खुप खुप वर्षा पुर्वी समाजात चार प्रकारची विषमता होती. ती आशा प्रकारे
*१ विद्धवान/पंडीत :-* यांनी फक्त शिक्षण घ्यायचे. राजाला उपदेश देणे, पुजा अर्चना करणे इ.
*२ क्षत्रिय* यांनी राज्याचे, राजाचे, प्रजेचे रक्षण करणे
*३ वैश्य* हे आजच्या व्यापरी वर्गात मोडतात.
*४ शुद्र*यानी वरील तीघांची कामे करणे.
     ह्या चार प्रकारात विभाजन झाले होते. दिवसेंदिवस यात बदल होत गेला. पण याच विभजणाची मुळे माणसाच्या मनात खोलवर रूतली गेली आहेत. ती आज वर वेगवेगळ्या माध्यमातुन रूततच चालली आहेत.
                 आजचा विचार केला तर *सर्व धर्म सम भाव* आसलेल्या देशात कुठल्याच प्रकारची समानता नाही. *जात, श्रीमंती, वर्ण, भाषा, राज्य* आशा कित्येक प्रकारात समाज वाटला गेला आहे. यात आजुन एक कारण आहे की ज्या मुळे समाजात सर्वात जास्त विषमता पसरत आहे ती गोष्ट म्हणजे *राजकारण* या मुळे घरातील रक्ता-मासाचं नात आसलेल्यांच्यात सुद्ध जीव घेण वैर निर्णान होत आहे. त्यातच जर जातीच्या नावने जर काही घडलं मग तर नावच घेऊ नका *दंगलच उठते अन पाणी वहावे असे रक्त वहाते.* माणसाच्या मनात जेवढ्या लवकर विषमतेच भुत घुसत तेवढ्या लवकर जर *मानवता, प्रेम* घुसली असती तर विषमता कधीच वाढली नसती. सध्याच्या युगात तर *जातीवाद* हाच विषमतेचा प्रमुख घटक असावा. *जातीयप्रेम* हे इतकं वाढल आहे की सांगायलाच नको. *जर ही विषमता खरोखरच नष्ट करायची असेल तर ही जातच नष्ट करायला हवी, जर असं झालं नाही तर विषमता कधीच नष्ट होणार नाही.* जाती वाद सुद्धा महापुरूषांच्या नावाने केला जातो तोही त्याच्या नावाने की त्यानी सर्व जाती एकत्र आणण्यास आपलं जीवन समावुन घेतलं होतं. जाती मध्ये *रंगाचा* ही तेवढाच मोठ्या स्वरूपात *विषमता* पसरते.
               कधी कधी वाटतं ही विषमता कधी संपणारच नाही. कारण विषमता नको म्हणणारेच विषमतेची बीजे पेरताणा दिसतात. अनं त्याला *पैशाच* पाठबळ लावलं मग का *प्रसिद्धी व मुबलक पैशासाठी* काहीच करावं लागत नाही *देवाच्या* नावाने ही विषमता वाढत आहे.
          विषमता नष्ट करायची असेलच तर *जात, धर्म, देव, भाषा, प्रांत, वर्ण, गरीबी, श्रीमंती* या सर्वच गोष्टीवर नियंत्रण करणे गरजेचे आहे. *हे शक्य तर नाही पण अशक्य ही नाही* पण या मुळे मानवी हक्कांचा भंग होतो असे म्हणता. *ना कधी आजच्या कुणाच्या मनात विषमता नष्ट करण्याचा विचारच येणार नाही*
    *म्हणुन ही विषमता काही संपनारच नाही*

*संपली ही ममता*
*मानसा मानसातील*
*जोपासली ही रोपे*
*विषमतेची.....*
---------------------------------------
नागेश टिपरे
मु. पो खडकी ता. दौंड
जि. पुणे
8600138525

Saturday 3 December 2016

लेखणी बंद पडली तर

*लेखणी बंद पडली तर*
***********************
कुठे गेले ते कवी
जे शब्दा शब्दाला कविता करून
आडाणी माणसाला पण मोहीत करायचे
त्यांची किती बोलायची लेखणी प्रखर
कडव्यातच काय शब्दा शब्दातुन पेरायची साखर
मग मला वाटायचं
कविताच वाचत सुटाव, दिवसभर नाही मिळाली तरी भाकर
पाऊस पडायचा प्रेम कवितांचा
कधी मन भरायचं
तरी
आश्रु ही वाहायचे
पण
आता कवी व कविता यांचा अर्थच बदलत चालला आहे
कवी बरोबर कविता ही मोकार सुटली आहे
शब्दांचे कवी शब्दालाच लावुन धरतात
रहाटा चं चाक पुन्हा ओढुन धरतात
मोहीणी घालणारे शब्दांनी
आज विचार करायला लावला आहे
कुठे मिळतील ते शब्द
ज्यानी प्रेम करायला शिकवलं
माणसातलं माणुस पण त्यांन टिकवलं
बंद पडली का ती लेखणी
बंद पडलाय का तो विचार
विसरलात का साहित्य प्रेम
का
विसरलात त्या लेखणीला
आज नक्कीच लेखणी चालेल
नाही तर
लेखणीच बंद पडेल
हे देवा
बंद पडलेल्या लेखणीला
शब्दांचा पाझर फुटु दे
नाही तर माझं रक्तच आटु दे
*********************
नागेश टिपरे

Thursday 1 December 2016

गडबड

दार वाजवलं
कुणी तरी
जाऊन पहातो
दारात उभी परी

म्हणते कशी;
जरा बाजला तु ये रे
मोबाईल कुठ ठेवला तु रे

काळजात होतयं
माझ्या धडधड
लांब का आहेस तु 
बंद कर *तुझी*बडबड
आली आहे मी
सर्वांना चुकवुन
एकांतात क्षण रमवु
आलेली संधी
पुन्हा नको गमवु

मिठीत घे
काळजाशी धर
ओठांवर नाही तर नाही
गालावर तरी एक चुंबन कर
➖➖➖➖➖➖➖
नागेश टिपरे

3


रूसते फगते तु माझ्यावर
आहे अबोल माझी परी
माफ कर एक वेळेस
समजावु किती तुला परी
********
नागेश टिपरे

Wednesday 30 November 2016

तुला पाहुन

*""""तुला पाहुन""""*
******************
सुर्या तु का निघालास मावळतीला.
आठवण येईल तुला पाहुन माझ्या परीला.

क्षण क्षण कैद करण्याचा करेन ती प्रयत्न.
माती मोल समजेल मग हिरे, माणिक, मोती व रत्न.

माझी ही व्यथा काही तीच्या पेक्षा कमी नसेल.
पाहुन मी तुला क्षणात उठेल; क्षणात बसेल.

आठवेल मला तु कधी माझ्यावर रूसलेली
चुकलो पिल्लु, म्हणताच लाजुन तु हसलेली.

हे सुर्या कसा रे मी तुला आडवु
जाता जाता नकोस रे असा मला चिडवु

वेळ हळु हळु सरत चाललीच आहे
तुला पाहुन आठवणी पुन्हा आठवत आहे

नयना मधुन अश्रु मी खुप ओघळतो
तुझ्या सम मी ही आज मावळतो
*****************
नागेश टिपरे

Tuesday 29 November 2016

*चित्र चारोळी स्पर्धा*
******************
संसार आमचा हा पाठीवरी
चुल-मुल याच्यातच आम्ही बंधिणी
अखंड चालला संघर्ष जीवनाचा
कशी माहिती होईल ती लेखणी
**************
नागेश टिपरे
*@९१*
८६००१३८५२५

खुप झाली मस्ती
करा आता माफी
द्या सोडुन विषय
नाही
तर होईल वजाबाकी
*****
नागेश टिपरे

Monday 28 November 2016

सायंकाळची वेळ


***********************
*"""""सायंकाळची वेळ""""*
***********************

चिव-चिव करतो पाखऱंचा थवा
पिल्लां जवळ गुतंला जीव जवा

दिन कसा तो त्यांनी काढला अासवा
घरट्या कडे निघता, एक क्षण न घेतला विसावा

पोरा सोरांचा नाही संपला अजुन हा खेळ
कोण कुणाला घालत आहे प्रेमाची ती शिळ

हातात कासरा; पुढे चालतीय बैल जोडी
संगे त्याच्या कारभारीण; डोईवर तीच्या वैरणकाडी

वीणा मृदुंग वाजतोय, घुमतोय तो टाळ,
तिन्ही सांजेची ती वेळ; आजी जपतेय माळ.

लावुन दीप उजळला तो प्रकाश
तांबुस तांबुस मन मोहक ते अाकाश

सायंकाळ होत होता भास्कर निघाला
निरोप घेऊन डोंगरा आड तो विसावला

जाईल तो निजेल आईच्या कुशीत
वाट पाहिल मी तुझी उद्या पुर्वेच्या दिशेत
***********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
जि.पुणे
८६००१३८५२५

Sunday 27 November 2016

भरकटलेली युवा पिढी

*""भरकटलेली युवा पिढी""*

      भारताला स्वातंत्र होऊन जवळपास ७ दशके होत आली. तेव्हाचा भारत व आताच भारत या मध्ये जमिन अाभाळा एवढा फरक आहे. पुर्वीचे तरूण *इंक्लाब जिंदाबाद, भारत माता की जय* या सारखे घोषना देत असायचे. आई म्हाणायची मरायचंच आहे तर देशा साठी मर बायकां सारखा घरात बसायच असेल तर बांगड्या भर बांगड्या. अनं आताची या पोराला घरातुन बाहेरच येऊ देत नाही, समाज सेवा तर सोडा राव. तरी पण हे कार्ट गपचीप गाडी घेऊन गावातील गल्ली बोळानं हॉर्न वाजव हिंडतं. त्यावर *चायनाच्या* मोबाईल वर लावलेलं *शांताबाई, बाई वाड्यावर या* असली गाणी काय बंद करत नाही.
    कधी कधी वाटतं तंत्रज्ञान कुठ गेलय. अनं खरच आपण या तंत्रज्ञाना बरोबर चालत आहोत का? शहरातील तरूणा  बरोबर खेड्यातील ही तरूण काही मागे राहीले नाहीत. पण हे *दोन्ही तरूण तंत्रज्ञानाचा खरच योग्य वापर करतात का.* आजची युवा पिढी इंटर नेट मुळे कुठ तरी भरकटत चालली आहे. प्रत्येक युवा पिढी ही शारिरीक वासनेला बळी पडत आहे. ती एक शरीराची गरज आहे, हे मी मान्य करतो पण ते त्यासाठी काही वयोमर्यादा आहे. ज्या वयात मुलांच शिक्षण घेण्याच वय असतं त्या वयात ते पोरीला घेऊन फिरायला जातयं. ह्या युवा पिढीतील ७५% ते ८०% तरूण-तरूणी *पॉर्न क्लिप व वेब साईड* ग्रासलेली आहे. यातुनच युवा पिढीत वासनेची भुक निर्माण होते, अन हीच भुक भागली नाही तर *लैंगीक छळ, छेडछाड, बलात्कार* या सारखी कृत्य घडत जातात. याच वासनेला बळी पडुन तरूण-तरूणी याच्यातील अनैतिक संबध. मग काळ मानगुटीवर येऊन बसल्या सारखा *एच आय व्ही* सारखे रोग झपाट्याने वाढत आहेत.
     वाढत्या लोकसंखेत हा *एच आय व्ही* हा सुद्धा तेवढ्याच वेगाने वाढत आहे. हा वाढण्याचे कारण म्हणजे *पेशा ने वैश्या व्यवसाय* करणारी नसुन *समाजात प्रतिष्ठीने रहाणारी तुमच्या आमच्या सारख्या व्यक्ती आहेत* आपणच कित्येक बाहेर अनैतिक संबध ठेवतो व *लाज वाटते* म्हणुन त्याची दक्षता घेत नाहीत. मग आपल्या पेक्षा त्या *वैश्या* बऱ्या नाहीत का किमान त्या या रोगावर उपाय नाही म्हणुन त्या आहे त्या उपाय योजनेचा अवलंब तरी करतात.
              प्रत्येक देशाचे भवितव्य हे त्या देशातील तरूण पिढीच्या खांद्यावर असते. पण; आपले देशात तर सर्वात जास्त आहेत पण हे *व्यसन, वासना, स्वार्थी पणा, पैशावरील अती प्रेम* याच्या अधिन झाले आहेत मग आपल्या देशाचे भवितव्य तरी काय असेल या गोष्टीचा विचार तरी मनात आला तरी चिंता वाटु लागते.
          *स्वामी विवेकानंद* म्हणाले होते *मला सामर्थवान व धैर्यशाली १०० तरूण द्या मी देशाचे भवितव्य बदलुन दाखवतो* पण *सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आज ही आशे १०० तरूण भेटले नाही ही एक सर्वात मोठी शोकांकीता आहे*
जय हिंद
🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश टिपरे *@९१*

Monday 21 November 2016

बँकेतील विनोद

मी परवा SBI बँकेत गेलो
*सर्व गंभीर होऊन रांगेत उभे*

अन आशातच मी कॉशिअर ला जाऊन  म्हणालो सर पैसे exchange करायचे होते

*कॉशिअर*:- a/c आहे

*मी*:- इथ नाही; बारामतीला आहे

*कॉशिअर:-* मग तिथच जा ना

*मी:-* पण पैसा तर कुठ पण exchange करून देतातात

*कॉशिअर:-* नाही

*मी:-* द्या ना सर
कॉशिअर:- ३:४५ ये

*मी:-* सर मी खुप लांबुन आलोय पार खडकी वरून

*कॉशिअर:-* लांबुन आलास, मी पण लांबुनच आलोय
येरवडा वरून येतोय

*मी:-* *पैसे exchange करू नाही देणार हे पाहुन)*
सर येरवड्याच्या आतुन येतात का बाहेरून.

हाहाहाहाहाहाहाहा
😝😝😜😝😜😝😜😝😝😜😝

नागेश टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे

Sunday 20 November 2016

चलन बंदी (विधायक का विघातक)

-------- *स्पर्धेला* ----------.

*चलन बंदी*
*(विधायक का विघातक)*

➖➖➖➖➖➖➖➖➖
                 नोटा बंदी ही झाली ही गोष्ट चांगली की वाईट या मतावर आजपर्यंत कोणीच ठाम नाही. प्रत्येकाचा दृष्टीकोन हा प्रत्येक वेळी बदलत आहे. ज्या कडे ५००/१००० च्या नोटा नाहीत तो फक्त जाम खुश वाटत आहे. पण ज्याने ज्याने दिवस रात्र काबाड कष्ट करून मिळालेल्या पैशाला पैसा जोडुन मुलाच्या शिक्षणाला, मुलीच्या लग्नाला घरात साठवलेली रक्कम किंवा बँकेतुन काढलेली रोकड यांची मात्र चागलीच दुरदशा झाली आहे. रक्त ओकुन जरी ही रक्कम कमवलेली असली तरी या रक्कमेचा यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा हिशोब नाही. अन जी मोठी रोक्कड बँकेतुन काढली आहे ती तर काही *पन्नास शंभरच्या* स्वरूपातुन बँकेने दिलेली नसेल.
         या मुळे या प्रक्रियेत सर्वांत जास्त नुकसान तर आम जनतेचेच झालेले दिसत आहे. जो शेतकरी सकाळी ७ ला शेताता नांगर धरायचा तो नाईलाजा ने पहाटे पासुन सुर्य मावळतीकडे झुक पर्यंत बँकेच्या रांगेत थांबुन मग तिथुन पुढे जनावरांची वैरण काडी करताना दिसतोय. शेवटी आपलाच पैसा देऊन जुन्या नोटांच्या बदल्यात मिळनाऱ्या त्या नविन एका नोटे कडे असे बघत थाबावे लागते जसे भिकारी दुसऱ्याच्या दारात येऊन जशी भिक मागतोय. या वर उपाय म्हणुन दोन दिवस बंद ठेवलेली ATM आज ही सुरळीतल चालत नाहीत, काही ठिकाणी   तर ९ ऑक्टोबर ला बंद केलेल्या ATM च्या दरवाजा सुद्धा अपाद्य उघडला नाही. सर्व सामान्य व्यवहारात २००० च्या नोटाची नाही तर *५,१०.२०,५० व १००* या नोटांची गरज भासते त्याच नोटा चलनात कमी प्रमाणात येत आहे . आहे ती २ हजाराची नोट, पण ती सुट्टी करून देतो का कोण. *मेडीकल, दवाखाने, पेट्रोल पंप* या ठिकाणी आज पण ५००/१०००  च्या नोटा चालत आहेत पण एकच अट ५००/१००० ची पुर्ण खरेदी करावी लागेल.
*अर!!!! ज्या लोकांची दिवसाची कमईच २०० किंवा २५० रू आहे त्यांनी काय करावं. तरी  सर्व सामान्य जनता रांगेत उभी आहे, आणि हा प्रत्येक त्रास सहन करतीय ती ही सर्वसामान्य जनता. करण यांना आजुन ही वाटतंय
*कुठ तरी*
*कोण तरी*
आपला विचार नक्की करत असेल. पण ज्याच्या कडे काळा पैसा आहे तो तर त्याने आधी गुंतवला गेलाय *फॉरेन एक्सजेन मार्केट मध्ये* की ज्याच्या वर कसल्याच प्रकारचा *Tax* बसत नाही. अन राहीलेला *काळा पैसा* अजुन पण येतच आहे *व्हाईट मनी* होऊन. अन हे करत आहे *ठेकेदार, कंपनीचे कामगार ठेकेदारर, दुध व्यावसाय चालावणारे, किरकोळ व्यावसायीक, दलाल* यांच्या सारखे आधी पैसे हातात दे म्हणालो तर म्हणायचे एवढ्या  मोठ्या रक्कमेचा व्यवहार रोखीने करण्याची परवानगी नाही म्हणाचये. आम्ही तुमचा पैसा तुमच्या खात्यात जमा करू म्हणुन चार-पाच दिवस रखडत ठेवायचे. हेच लोक आता २०-२५ हजाराची रक्कम दोन दिवस आधीच घरी आणुन हातात देते आहेत. *हा तुमचा पगार/ हे तुमच्या मालाचे पैसे* कोठुन आला एवढा पैसा. 
मुख्य कंपनी ने तर प्रत्येक वेळे सारखा *चेक* ने च यांच्या बरोबर व्यवहार केला. मग काय बँकेने याना परत १००/५००. च्या नोटा परत केल्या, *नाही; हा पैसा आहे त्यांचा स्वताःचा, राजकीय पुढारीचा, बिल्डर, कॉंट्रक्टरस, उद्योगपती* यांच्या सारख्या कर बुडवणाऱ्या लोकांचा. पण या त्रास सहन मात्र करत आहे सर्व सामान्य जनता. कारण हा सर्व काळा पैसा आपल्या सारख्या लोकांकडे येतोय. त्याच्या बदलात आलेला सफेद पैसा याच्या खात्या जमा होतोय. आपणच करतोय पुन्हा काळ्या पैशाचे रूपांतर सफेद पैशात.
एवढ सर्व होऊन ही हे सर्व शांत आहे कारण यांना आज ही वाटत आहे की *काही तर मिळवण्या साठी काही गमवाव ही लागतं* फक्त ह्या  एका मनात येणाऱ्या विचारा मुळे,
आणि *आपण म्हणतो काळा पैसा बुडाला.*
    मी स्वताः तरी व्यक्तीक म्हणेन काळा पैसा बुडालाच नाही तो फक्त सफेद होत आहे. फक्त बदल एवढाच आहे ज्यांचा काळा पैसा आहे ते स्वताः समोर येऊन न करता करता दुसऱ्याच्या आडुन हे करत आहेत.
*यालाच म्हाणताता दुसऱ्याच्या खाद्यावर ठेऊन बंदुक चालवणे खून पण होतो स्वताःची निर्दोष मुक्तता*
**********
नागेश शेषराव टिपरे
         *@९१*
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे
८६००१३८५२५
nageshtipare@gmail.com

nageshtipare.blogspot.com

Friday 18 November 2016

सत्य हे तुम्ही समजुन घ्या....

त्य हे तुम्ही समजुन घ्या.....

तुम्हालाच तुमची मदत करावी लागेल
वादळात सापडलेली नौका बाहेर काढावी लागेल
    सत्य हे तुम्ही समजुन घ्या.....

सुखाच्या शोधात तुम्ही भटकनार किती
जगाच्या पाठीवर रोज बदलत आहे रीती
    सत्य हे तुम्ही समजुन घ्या.....

कुणीत नसतो हो कुणाचा
सत्यावर विश्वार ठेवा तुम्ही मनाचा
    सत्य हे तुम्ही समजुन घ्या.....

इमानी आहेत अजुन ते प्राणी
माणुस करतोय रोजच आणीबाणी
    सत्य हे तुम्ही समजुन घ्या.....

चार दिवस जगणार तुम्ही आम्ही
प्रेमाने च जगु ना मग आम्ही तुम्ही
    सत्य हे तुम्ही समजुन घ्या.....

कळवळुन नागेश करतो आहे विनंती
तीरस्कारा पोटी नको ती आपणास भटकंती
    सत्या हे तुम्ही मानुन घ्या.....
    सत्या हे तुम्ही मानुन घ्या.....
    सत्या हे तुम्ही मानुन घ्या.....
-----------------------------------------

नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
जि.पुणे
मो.नं:-८६००१३८६२५

Wednesday 16 November 2016

माणुस बनायला शिका

*माणुस बनायला शिका*
➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रत्येकाला वाटतंय मी आहे श्रेष्ठ
प्रसिद्धीने झालात रे तुम्ही गर्वीष्ठ

प्रसिद्धी ही हळुहळु लागते लयाला
त्याच्या मुळेच आलेला गर्व मिळतो मग धुळीला

तेव्हा आठवतात मग आपली माणसं
खुडून गेलेली असतात तेव्हा काळजाची कणसं

विनवणी करतो, लाचार ही होतो
प्रेमा पोटी तुम्ही नथमस्तकी होतो

नव्हे बरा तुमचा हा स्वभाव
विरले कुठे ते हाव भाव

मानसाच्या जन्मात आलात
मानसा सारखे जगा रे

गल्लो गल्ली हिंडुन तर
कुत्री ही जगतात रे

गुरफटलेला अंहकार झटकुन बाहेर फेका
प्रेमाची भावना आता तरी शिका

कवी तर कोण ही बनेल रं
कवी होण्या आधी तुम्ही माणुस बनायला शिका
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
जि.पुणे
मो.नं:-८६००१३८६२५

Sunday 13 November 2016

बदल

मानुसकी च्या जागत
काय काय बदलतय
कधी तुम्ही
तर
कधी आम्ही
याच बरोबर मानुसकी ही बदलतेय

येतो असतो आडवा प्रतेकाला
कधी स्वार्थ
तर
कधी घमेंड
याच बरोबर ओळख ही बदलतेय

समजत नाही कुणाला कुणाच्या भावना
नडतात
कधी द्वेष
तर
कधी अहंकार
याच बरोबर सर्वांची बदलतेय नीती

आपुलकी बदली
आपुलकी बरोबर प्रेम बदललं
प्रेमा बरोबर भावना बदलल्या
भावनांन बरोबर काळ बदलला
काळा बरोबर वेळ बदलली
वेळ बरोबर आपण ही बदललो
आपल्या बरोबर स्वागताची
स्वागताची पद्धत ही बदलली

क्षण प्रेमाचे

*"""""""""""क्षण""""""""""*
***********************
हातात तीचा हात हवा होता

रहीला मात्र तो काहीच क्षण

वाहीले आश्रु मन ही मन

लिहीली कविता मग

आठवल्या तिच्या आठवणी संग

जुन्या प्रेमाचे भुतकाळातील क्षण

कसे राहीले तिच्या वीना मन

पाहिले त्या कवितेकडे मग

पाहीले तिच्याकडे काही क्षण

खचले पुन्हा एकदा मन

रेतीवरी पाहुन कविताचे क्षण

लाटे बरोबर पुसली कविता

भरून आले माझ मन

**********************

नागेश शेषराव टिपरे

मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे

मो.नं:-८६००१३८५२५

क्षण

*"""""""""""क्षण""""""""""*
***********************
हातात तीचा हात हवा होता

रहीला मात्र तो काहीच क्षण

वाहीले आश्रु मन ही मन

लिहीली कविता मग

आठवल्या तिच्या आठवणी संग

जुन्या प्रेमाचे भुतकाळातील क्षण

कसे राहीले तिच्या वीना मन

पाहिले त्या कवितेकडे मग

पाहीले तिच्याकडे काही क्षण

खचले पुन्हा एकदा मन

रेतीवरी पाहुन कविताचे क्षण

लाटे बरोबर पुसली कविता

भरून आले माझ मन

**********************

नागेश शेषराव टिपरे

मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे

मो.नं:-८६००१३८५२५

Saturday 12 November 2016

स्पर्धा

गुरफटलीय युवा पिढी
करते आहे ती स्पर्धा
होतात ते बेधुंद विजयाच्या नशेत
मग; हीणवतात दुसऱ्याला मागे राहीलास तु मर्दा

आजकाल प्रत्येकालाच
करावी लागते आहे स्पर्धा
प्रेमची स्पर्धा, भक्ती मध्ये ही स्पर्धेा
खाण्या पिण्याची स्पर्धा
विचार मांडण्याला ही स्पर्धा
माणुसकी बनुन राहीलीय स्पर्धा.

राजकारण ला स्पर्धा
समाज सेवाला स्पर्धा
शिक्षणात स्पर्धा
लाजीरपणा तर तेव्हा वाटला
अन्नाची सुद्धा केली स्पर्धेा
😞😞😞
विचारांची माडंणी पासुन
शेतातील काढणी पर्यंत
सुरू केली कोणी स्पर्धा

माथी चढले आहे
भुत हे स्पर्धेच
नव्या पिढीला हे जखडतय
या मध्ये नवजातांना ओढतय
स्पर्धेच्या नावा खाली गुणवत्ता सोडुन
वैर दुश्मनीला ठेवत आहे मनाला जोडुन

सोड तरूणा ती स्पर्धा
ती जाईल घेऊन तुला मर्दा
काहीनां वाटेल बोलतो मी निशफळ
लिहीले आहे ते वायफळ
म्हणुन का संपेल ही स्पर्धा
देशाच्या भविष्याची सुरू होईल स्पर्धा
पहा मग तुम्ही
स्पर्धा..स्पर्धा....
स्पर्धा.....स्पर्धा..........
..........................
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:खडकी ता.दौंड
जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५