Thursday 22 September 2016

आठवण

*आठवण*
छळते ती आठवण
मिळते ती आठवण
साठते ती आठवण
आठते ती आठवण
जळते ती आठवण
कळते ती सुद्धा आठवण
रडते ती आठवण
जाणवते ती आठवण
विरते ती आठवण
सरते ती आठवण
कमतरता ती आठवण
पुरते ती आठवण
कल्पते ती आठवण
विचारते ती आठवण
झुरते ती पण आठवण
जाते ती पण
येते ती पण
आठवण
आठवल्या वर ये ती *आठवण*

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

तीच्या आठवणीत

ती कुठे असेल
मी कुठे असेल

तीच्या वीना कसे कसे राहु
चांदणी उगवताच दोघे
ही तीच्या समोर जावु

ती पाहिल चांदणी कडे
मी पाहिल चांदणी कडे

ती कशी आहे मी विचारेन तिला
मी कसा आहे हे ही ती विचारीन तिला

ती थोडीशी हासेल
लाजत लाजत ढगा मध्ये बसेल

तिचा जीव कदाचीत तीळतीळ तुटेल
माझ तर काळीजचं फाटेल

म्हणुन वाटते ती दुर नसावी
ती दुर असेल तर
सायंकाळची वेळ तिथेच रूसुन बसावी

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

उत्तर

(नाती तुटताना ही कथा वाचल्या नंतर एका मुलीशी झालेला संवाद)

आज ही मला
त्यांचा एक कॉल आला
म्हणाल्या, सर
एक प्रश्न विचारू का तुम्हाला
खरे खरे उत्तर देताल का आम्हाला

बोलत बोलत त्यांना
मी ही हो म्हणालो
खरे खरे च उत्तर
सांगतो म्हणालो

म्हणाल्या त्या
आधी नीट तुम्ही बसा
मग मन ही मन तुम्ही हसा
प्रश्नच विचारणार आहे असा

सांगा मला आता
काय करतो तो राजु
कसा आहे तो दत्तु
कुठे असती ती नंदिनी
का झाली ती कुणाची बंधिणी

तुमच्या नाती तुटताना चा....
अर्थ तरी काय
मला सर्व ऐकल्या शिवाय
आज रहावणारच नाय

तुमचा अनं त्याचा संबध काय
का तुम्ही
राजु, दत्तु मध्ये
स्वताःला पहाता काय

ऐकताना प्रश्न त्याचा
क्षणातच त्याची
आठवण मला आली
तो पर्यंत
आसवे मात्र थरथरत्या
ओठाना भेटायला गेली

मी ही होतो एक बदनशिब आसा
पाण्यासाठी तडफडतो एक जिवंत मासा
प्रश्नच होता त्यांचा आसा
उत्तर देऊ तरी मी कसा
***************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
http://nageshtipare.blogspot.in

Tuesday 20 September 2016

प्रतिक्षा

पिंपरी नावाचं एक आटपाट नगर होतं. त्या गावात एक शेतकरी राहत होता, त्याचं नाव होतं हौशिराम. तसा हौशिराम कष्टाळु होता, त्यातच त्याच शिक्षण ही कमी झालं होतं. म्हणुन त्याला वाडवडिलांची शेतीकरण्या शिवाय दुसरा पर्यायचं नव्हता. तो तसा त्या काळ्या धरणीमाय वर जीवापाड प्रेम करायचा.
            वैषाख महिन्याचं ऊन हळुहळु कमी होऊ लागलं होतं. कधी मधी वार-कावार पण सुटत होतं. त्या वेळे पर्यंत हौशिराम ने आपल्या शेतीची सगळी मशागत पुर्ण केली होती. मशागती साठी तो संपुर्ण ऊन्हाळ बायकां-मलांसह व पाखऱ्या-हिऱ्या बरोबर राब राब राबला होता. इतर बळीराजा प्रमाणे त्याची ही नजर आता त्या मिरगाच्या पहिल्या पावसा कडे होती. गेल्या दोन वर्षाचा दुष्काळ संपावा या आशेने त्याने शिवारातील सर्व देव-देवतांना निवद नारळ पण केला होता. हळुहळु दिवस सरू लागले पण त्या बळीराजा च्या काळजाची आग काय त्या मेघराजाला दिसली नव्हती.
           इकडे हौशिराम ने घेतलेल्या सावकाराच्या कर्जाचा डोंगर मात्र वाढतचं चालला होता. मागील दोन वर्षात घेतलेले कर्ज अजुन काय फेडण झालं नव्हतं, पण काय तरी जमवा जमव करून तो दर महिन्याला सावकाराचं होणार व्याज मात्र नित्य नेमाणे चुकवत होता. ऑगष्ट महिना संपत आला पण पावसाने काय तोंड दाखवले नव्हते. अनं कधी तो यायचा पण कोल्ह हुक दिल्यासारखा निघुन जायचा. कधीतरी येणाऱ्या या कोल्ह हुक पावसा मुळे सर्वच शेतकऱ्यांच्या मनाला आस लागुन बसली होती, की एकदाचा का होईना पाऊस पडलं. परतीच्या पावसाचे दिवस पण निघुन गेले पण पाऊस काय पडला नाही. हौशिराम ने लावलेली तुर व कपाशी सुकुन गेली होती. त्याने आता कपाशी वेचायला सुरवात केली. जास्त काही नाही पण जेमतेम खर्च निघल एवढचं उत्पन्न झालं. तुर तर काढायला सुद्धा परवडनार नव्हती पण करणार काय, तेवढचं चार पैस म्हणुन तुर पण काढुन घेतली त्यात दीड पोती तुर झाली.
         दिवाळी समोर येऊन ठेपली होती शेतातील काही कामे सुरू झाली. दिवाळी साठी हातात पैसा उरला नव्हता, म्हणुन हौशिराम सावकाराकडे गेला अनं मागल्या कर्जाच्या बदल्यात आरसाडाचं शेत सावकाराला लिहुन दिलं, व नविन कर्जाची मागणी केली. तसा तोही कणतं-कुततं तयार झाला. पण हे फक्त दाखवाया पुरतेच होते, त्याच ही या व्यव्हारातं फावलं होतं. मनातील मनसुभा तर साबित झाला होता. अनं मन ही मन तो खुष होता कारण त्याच्या ईष्टेटीत आणखी भर पडणार होती. त्याला वाटायचं दर वर्षी दुष्काळ पडावा आणि गावकऱ्यांनी माझ्याकडं कर्जाला यावं. या वर्षी निम्म्य पेक्षा जास्त लोक हे सावकाराचे कर्जबाजारी झाले होते. कुठुन ही पैसा मिळत नसल्याने सावकार म्हणेल त्या अटीला तयार होत.
       रब्बीचा हंगाम सुरू झाला पण म्हणावं तशी ओल ना शेताला ना त्याच्या हाताला होती. जेमतेम पैशाची जमवाजमव करून जेमतेमचं शेतकऱ्यानी पेरण्या केल्या. त्यात ही त्यांच्या हाताला काही लागलं नाही. यात थंडीचे दिवस कसे निघुन गेले हे कळलं सुद्धा नाही. या वर्षी ऊन्हाळा लवकरचं जाणवु लागला. ऊनाचे चटके बसु लागले. सर्व काय बळचं चालावं तस सर्व काय चाललं होतं. गावचा उरूस जवळ येऊ लागला. गावकरी उरूसाच्या तयारीला लागले. उरूसावा सर्वांनी ग्रमदैवतेची पुजा केली. या वर्षी तरी पाऊस पडु दे म्हणुन गावातील लहांना-थोरांनी देवाला दंडवत घातलं. देवाचा कोप आता तरी जाईल अनं पाऊस पडलं या आशेवर शेतीची कामे करू लागली.
               हौशिराम ने ही पाखऱ्या-हिऱ्या बरोबर नांगर धरला. या वर्षी लय पाऊस पडणार म्हणुन नागंरणी वरचे गाणे ऐकु येऊ लागले. मोठ मोठे ढेकळ मागे पडु लागले. आठ दिवसात सर्व शेत नांगरूण झालं. पावसाचे दिवस जवळ येऊ लागले तसातसा हौशिराम च्या काळजाचा चुकतो की काय आशी अवस्था होऊन बसली होती.
           पण देव काय या वर्षी पण पिंपरी गावावर प्रसन्न व्हायचा दिसतं नव्हता. या वर्षी पण पाऊस ने गेल्या वर्षी सारखाच तग धरला होता. जसा पाऊस तग धरत होता तसा सावकार खुष होतं होता. या वर्षी वरूण राजा खुपच कठोर बनाला होता. जनावर सुद्धा चारा पाण्या वाचुन तरफडु लागली. शेतातल्या नांगरटीची शिग सुद्धा मोडली नव्हती. जमिन नाही पिकली म्हणन काय झालं पण माणसाच्या पोटात उसळणारी भुकेची आग काय शांत होणारी नव्हती. ती होणारी आग अनं जनावरांची तरफड बघुन तो सावकाराच कर्ज काढतचं होता. या वर्षी मात्र गावातील पाटिल, देशमुख, यांच्यासारखी मोठ-मोठे शेतकरी सावकाराच्या कर्जाचे शिकार बनले होते.
            या वर्षी पाऊसचा एक थेंब ही पडला नव्हता. दिवाळी ही सुनी-सुनीच निघुन गेली. बघता बघता संक्रांत जवळ आली ऊनाच्या झळा जणवु लागल्या होत्या. आशाच एका संध्याकाळी गावातील मंडळी देवळात बसली होती. त्यातच एक जाणता म्हाणुस म्हणाला
       "पाऊस नाय पडला तर पयल्या काळात सार द्याव पण्यात डुबायला ठेवायची रीत होती पण आता कोण मानतो ही गोष्ट".
     त्याच्या या बोलान गावकऱ्याना थोडा दिलासा मिळाला. गावच्या उरसात देव डुबायला ठेवायचं ठरलं. सर्वांबरोबर हौशिराम ने ही सहमती दर्शवली. ठरल्या प्रमाणे उरसाच्या दिवशी गावातील सर्व देव गोळा केले अनं तीन दिवस पाण्यात ठेवले आणि चौथ्या दिवशी बाहेर काढुन दही दुधाने अभिषेक केला. गावातील मंडळी आता सर्वा खुष वाटु लागली. या वर्षी पाऊस पडनारच या वर ते ठाम होते. सर्वांनी शेताच्या कामाला सुरवात केली. काहींचे जनावरे बैल या दुष्काळात दगावले होते , त्यांनी कुदळीने खणुन शेतीची मशागत केली.
          पावसाळ्याचे दिवस येताच सुर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला वाहन बेडुक. म्हणजे भरपुर पाऊस पडाणार याची ती लक्षणे होती. पण देवाच्या काळजाला काय अजुन पिंपरी गावातील लोकांची साद पोहचली नव्हती. हौशिराम ने उरली सुरली जमिन पण सावकाराकडे घाण ठेवली होती. पाऊस काय पडायच नाव घेत नव्हता. त्याने हौशिराम चा जीव कासावीस व्हायचा. आता तर जमीन सुद्धा जाणार याने तो तीळतीळ तुटायचा. त्या या विचाराने नीट झोप सुद्धा येत नव्हती. तो क्षण भर स्वताःच्या नशिबाला दोष द्यायचा तर क्षण भर या देवाला  आशाच एका रात्री विचारा तो इतका गुंतत गेला की त्या सकाळ झालेली ही कळाली नाही. सकाळ होताच तो थेट शेतात गेला दुरवर पसरलेलं शेत पाहुन त्याच मन गहिवरून आलं, काही वेळ तो तसात स्तब्ध बघत उभा राहीला. चालत चालत तो गोठ्यापाशी आला पाखऱ्या-हिऱ्या वरून एकदा मायेन हात फिरवला. गोठ्यासमोरच असलेल्या वैरणीचा उरला सुरला पालापाचोळा गोळा करून त्याच्या पुढ टाकला, व गावकडची पावले चालु लागला. चालता चालता तो एकदम थांबला आणि पुन्हा एक वेळ कटाक्ष नजर पाखऱ्या-हिऱ्या वर टाकली. डोळ्यातील आश्रु पसुन तो थेट देवळात आला. देवाला एक वेळ नमस्कार केला, आणि हातातील कासऱ्याने देवळातच गळ्याला फास लावला. फास जसा आवळत गेला तसा तसा तो हात पाय खोडु लागला. जीभ चार बोट बाहेर आली होती अनं डोळ्यात रक्त उतरलं होतं.
   हौशिराम ने फाशी घेतली!!!!
    हौशिराम ने फाशी घेतली!!!!
    गावभर एकच चर्चा सुरू झाली. सुर्य हळुहळु ढळु लागला, त्याची किरणे मंदावु लागली. काळ्याकुट ढगांनी गर्दी होऊ लागली अनं क्षणार्धात पावसाने जोर धरला. एका शेतकऱ्याची शेतीच्या तळमळी मुळे केलेली आत्महात्या पाहुन वरूण राजा सुद्धा रडु लागला होता

Sunday 18 September 2016

असतो एखादा गद्दार मित्र

*असतो एखादा गद्दार मित्र*

असतो एखादा मित्र
आपलं वाईट चितणारा
पाठीत खंजीर खुपसनारा
असतो एखादा गद्दार मित्र

मैत्रीत धोका देणारा
दोस्ती शब्दला कलंक लावणारा
आतुन शत्रु आसणारा
असतो एखादा गद्दार मित्र

पुढे चालणाऱ्या मित्राचा पाय ओढणारा
त्याच्यावर ही उलट्या तंगड्या करणारा
खात्या ताटात हागणारा
असतो एखादा गद्दार मित्र

नसतात असले निधड्या छातीचे
कापतात हे गळा केसाने
आव आणतात हे प्रितीचे
असतो एखादा गद्दार मित्र

दाखवतात शेवटी स्वतःची लायकी
भाषा बोलतात गोडगोड बोलकी
मिळतात असले ठायी ठायी
द्याव वाटतं यानां हात्तीच्या पायी
असतो एखादा गद्दार मित्र
असतो एखादा गद्दार मित्र

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
http://nageshtipare.blogspot.in

Saturday 17 September 2016

मै इतना बेचैन ना होता

काश प्यार ना होता
तो मै इतना बेचैन ना होता

ना आती याद
सकुन से गजरती रात
प्यार का ना बुझता
दीया आज
      काश प्यार ना होता
      तो मै इतना बेचैन ना होता

कटती रातें
ना सताती ओ उसकी बाते
ना परेशान ये दिल होता
ना आज मैं रोता
        काश प्यार ना होता
      तो मै इतना बेचैन ना होता

गल्लती हुई
प्यार हुआ
सामने ओ आते
धडक धडक से
ये दिल धडकने लेता
      काश प्यार ना होता
      तो मै इतना बेचैन ना होता

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२

मुक मोर्चा

मुक मोर्चा

जिथे जिथे मराठ्यांचा मोर्चा
तिथे तिथे होणारच चर्चा
मोर्चा आहे आमच्या हक्का साठी
मग का दुखःतय कुणाच्या पोटी

आदर करतो आम्ही
शिवबा बाबासाहेब आहिल्याबांईचा
इतिहासात होतो एक
मग का विषय जातीचा

खुप जण मागे राहिले
त्या आरक्षणाच्या पायी
भरघोस गुणाची कमाई
मोजावा लागलायं पैसा ठायी ठायी

आता तर सुरवात झालीय
कुठे तरी मराठा एकत्र होतय
निर्णय आहे मुक मोर्चाचा
नाही तर काय कुणाला भीतोय

विखुरलो होतो तक्तासाठी
जमतोय आता रक्तसाठी
माय-बाप भाऊ-बहिण
उतराव लागले रक्षणासाठी

मराठ्यांचा इतिहास आहे हा
रक्ताचे भिजलेले किल्ले पहा
समजवते आज पण आम्हाला आमची आई
नाहितर
चिंधड्या उडल्या असत्या कित्येक तरी ऱाई-राई
चिंधड्या उडल्या असत्या कित्येक तरी ऱाई-राई

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

Thursday 15 September 2016

मी पाहिलं

वाय्रा सोबत खेळताना पाहिलं
त्याच्या बरोबर झुलताना पाहिलं
आकाशाकडे उंच हात देतानां पाहिल
त्याच्याकडेच बघुन साद घालताना पाहिलं
खेळतान पाहिल,बागडतान पाहिलं
रागवतान पाहिल,रूसतान पाहिल
रीमझीम पावसात चिंब भिजतान पाहिल
थंड त्याच्या स्पर्शाने लाजतान पाहिलं
आतुर आशा नजरेन तीने मला पाहिल
मग
ओल्या डोळ्यात पाणी येतानं ही मी पाहिलं
                           :- नागेश टिपरे
                     मो.न ८६००१३८५२५
                    मु.पो :खडकी ता.दौंड
                             जि.पुणे

दुरवर

आज त्या खिडकीतुन मी दुरवर पाहिलं
त्याच क्षणी मन मात्र हुरहुरत राहिलं
तुला पाहण्यासाठी हे मन वेड-पीस झाल
विचारांनी तर मनात तांडवच केलं
शरीर तर जागेवरच होतं
नजरे सोबत मन मात्र सैरावैरा धावत होतं
तु कधीच दिसनार नाही हे माहित झाल होतं
तरी वेड मन तुझ्या घरावरून फिरून येत होतं
आता तु खुप दुर-दुर होतीस
कोणीच पोहचनार नाही तिथे तु होतीस
समोर आता कोणीच नव्हतं राहिलं
तरीही त्याच खिडकीतुन मी खुप दुरदुर पाहिलं
तरीही त्याच खिडकीतुन मी खुप दुरदुर पाहिलं
                       नागेश शेषराव टिपरे
                    मो.नं:- ८६००१३८५२५
                   मु.पो:- खडकी ता.दौंड
                              जि.पुणे

मित्र

नाही बदलला तो तु थोडा बदलशील का;
समज नाही त्याच्यात तु त्याला समजावशील का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

चुकला असेल तो तु पण हीच चुक करनार का;
आहे तो वेडा माफी या वेड्याला करशील का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

कदाचित गुन्हेगार असेल तो तुझा तु पण हाच गुन्हा करनार का;
गरज आहे त्याला मैत्रीची परत मैत्री करनार का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

त्याने तोडली होती नाती तु पण नाती तोडनार का;
आज ही तो एकटाच आहे साथ त्याला तु देशिल का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

दुश्मन नही मित्र आहे तुझा मित्र म्हणुन राहणार का;
मैत्री या शब्दाला तु पण कलंक लावणार का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?
                            नागेश शेषराव टिपरे
                          मो.नं:- ८६००१३८५२५
                            मु.पो:-खडकी ता.दौंड
                                     जि.पुणे

प्रेम

प्रत्येक क्षणोक्षणी मला ती आठवत होती
म्हणुनच की काय स्वप्नात ही दिसत होती
वाटते प्रेमाची चाहुल लागली होती

होती दिसायला ती सोन्याचा महाल
रेशमासारखे केस आणि मुलायम तिचे गाल
सौंर्द्याची पदवी जणु निसर्गाने
केली होती तिला बहाल

पाहण्यात तिच्या होती एक वेगळीच अदा
पहात रहावे वाटत होते मला सदा
म्हणुनच काय झालो होतो मी तिच्यावर फिदा

काय होतं तिच वेगळ ते रूप
ज्यामुळे विसरलो मी माझी भुक

मी ठरविले एकदा तिला सर्व काही बोलायचं
तिच्या प्रत्येक शब्दाला अश्रु प्रमाणे तोलायचं

प्रेमाचा जिवंत ठेवला तिने दिप
म्हणुनच तिच्यावर
"प्रेम केले मी खुप
प्रेम केले मी खुप"
          नागेश शेषराव टिपरे
         मो.नं ८६००१३८५२५
         मु.पो:-खडकी ता.दौंड
                   जि.पुणे

नातं

जीवनाच्या वाटेवर चालताना
भेटले होते असंख्य प्रवासी
कोणी जोडली नाती
तर कोणी तोडली नाती
शेवटी होते काय
जीवनाची मातीच माती
प्रत्येकाशी मी दाखवली होती आपुलकी
हे आपुलकीच नातं होतं
सागराच्या रेतीवर लिहिलेलं
लाटेच्या झोक्याने पुसुन ते गेललं
डोळ्यांच्या काठावर ते भरतीला यायचं
तर कधी-कधी ते ओहटीला जायचं
प्रत्येकाची दिशा वेगळी
प्रत्येकाची आशा वेगळी
रंग, रूप आणि भाषा सुध्दा आगळी-वेगळी
कोणी आपुलकीन बोलायचं
तर कोणी तीरस्काराने दुसय्रांची मन तोडायचं
कोठे कोठे होती ही रूढ रीत
तर कोठे जडली माझी प्रीत
ज्यांच्या ज्यांच्याशी मन मिळलं
त्यानां त्यानां प्रेम माझ कळलं
                    नागेश शेषराव टिपरे
                  मो.नं:-८६००१३८५२५
                   मु.पो:-खडकी ता.दौंड
                           जि.पुणे

माफ

जीवनात माझ्या येऊन
मन माझे फुलवलेस तु
नाही समजु शकलो
कशी होतीस तु

प्रेमाचा पाऊस पाडुन
जीवनावर सावली धरलीस तु
शांततेचा मार्ग दाखवलास तु
तरी नाही कळाले; कशी होतीस तु

प्रेमाचे झाड लावुन
भावनांचे पाणी घातलेस तु
विश्वासाचा कट्टा बांधलास
पण नाही समजु शकलो
कशी होतीस तु

सोडुन गेलीस जेव्हा मला
नाही थांबवु शकलो मी तुला
फार फार वाईट वाटले मला
कारण; नव्हतो विचारू शकलो मी तुला
म्हणुन;
"माफ" करशील ना तु मला
----------------------------------
नागेश टिपरे
खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं ८६००१३८५२५

आघात

नागेश टिपरे लिहतोय.......

**** *आघात* *****
                 तो शनिवारचा दिवस होता. सुर्य हळुहळु मावळतीकडे झुकु लागला होता. सुर्याची तांबूस किरणे मनाला मोहुनच टाकत होती. निसर्गाला आज काय आनंदाचे उदाण भरून आले होते. वाय्राचा प्रवाह जास्त होत होता आणि क्षणार्धात निळ्याभोर आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाऊस येण्याची चिन्हे दिसु लागली. बळीराजाने हाताला वेग दिला आणि तेवढ्यात पावसाची रीपरीप सुरवात झाली. मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. पक्षी आपआपल्या घरट्यामध्ये दबा धरून बसली होती. मेंढपाळ व गुराखी आपआपले कळप हाकत घराच्या दिशेने पाऊले उचलत होती. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटीने पावसाने जोर धरला ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागली.
                  जसा- जसा पाऊस जोर धरत होता. तसा-तसा आबांच्या काळजा ठोका मात्र वाढतंच होता. कारण तालुक्याच्या ठिकाणाहुन घरी येणारा त्यांचा मुलगा श्यामा मात्र आजुन आला नव्हता. रात्र होऊन बरीच वेळ सरली होती. मुलाच्या काळजी पोटी आबांनी तालुक्याच्या ठिकाणाला जायचा निर्धार केला.
                मी जरा श्यामा का आला नाही हे पाहुन येतो असे आपल्या बायकोला बजावले. त्याची बायको रखमा ने गोणफाटांचा गोगंता हातात देत म्हणाली

"जरा बीगी-बीगी जावा नदीच पाणी वाढत चाललया"

मध्येच त्याची लहान पारू पुटपुटली"

आव आबा जीवून गेला आसता तर बरं झाल आसतं"

पारूची समजुत काढत गोंगता हातात घेत आबांनी घराबाहेर पाऊल टाकला. गावची इस ओलंडताच तालुक्याच्या वाटेवर झपाझपा पावले टाकु लागले. मध्यानंतर झाली होती आबा शिव ओलडुन हारणीचा माळ उतरू लागले. आता दोन-चार मैलावर तालुक्याच्या झगमगत्या बत्त्या दिसु लागल्या. नदीच्या खळखळत्या पाण्याचा आवाज हारणीच्या माळावर स्पष्ट ऐकु येत होता. आबा  लगबगीने नदीपाशी पोहचले व विठ्ठलाच नाव घेत नदीत सुर मारला. नदीचा प्रवाह त्यांना खालीखाली वाहुन नेहत होता. पण मुलाच्या काळजीने पाणी तोडत त्या पाण्याला तोंड देत त्यानी पलीकडील काठ गाठला, पावसाची टिपटिप तशीच चालु होती.
    अंगावरील अंगारख्यातुन पाणी टिपकत होतं. वाय्रातील गारवा गोठवुन टाकत होता, थंडीन मात्र काळीज गोठल होत. रातकिड्यांची चिरचिर व बेडकांची आनंदाने होणारी डरावडराव जणु शांतताच भंग करत होती. तशा शांततेत आबा श्यामा तो त्या घराकडे वळाले. पहाटे-पाहटे घरासमोर येताच दाराची कडी वाजवली, थोड्यातंच दार उघडले गेले आणि आबां पाहताच आतल्या पोराच्या तोंडातुन शब्द पडला 

'आबा! आनं तुमी; इतक्या रातच्याला'

चला आत या बरं त्यावर आबा बसक्या आवाजात पुटपुटले दर सनवारच्याला श्यामा घरी येत आसतोया आनं त्यो येनार आसल्याचा निरूप पन धाडला होता. आला नाय म्हणुन बघायला आलु
त्यावर श्यामाचा मित्र बोलला तो तर सांच्यालाच गेला हाय बघा तुमची आन त्याची चाकामुक झाली आसल बगा
                आबा लगेच परतीच्या प्रवासाला लागले. मस्तकात विचारांनी थैमान घातले. जसकाय त्या ठिकांची जागा त्यांना ऊचलुन फेकत होती. आबा जसेजसे पावले ऊचलत होते. तसेतसे मस्ताकात विचारांच वावंटळ उठत होतं. आबांची पावले आता घाईत घराच्या दिशेने पटापटा उचलत होती. सुर्य उगवतीच्या वेळीस आबा नदीपाशी आले. चिखलाने माखलेले पाय धुतले व नावाड्याला आवाज देऊन नावेत बसले. नदीचा ओघ ही आता कमी झाला होता. काही वेळातच कडेला उतरताच चारआणे नावाड्याच्या हातावर टेकवत आबा चालु लागले. हारणीचा माळ चढुन गावापाशी पोहचले.
                 गाव सुन्न पडले होते, आशातच आबा घराजवळ आले. काय झाले त्याना काही कळेना घरापुढे तर प्रचंड गर्दी जमली होती. सर्वत्र शांततेचे वातावरण पसरले होते. प्रत्येका काय झाले ते विचारत होते परंतु कोणीही काही सांगण्यास तयार नव्हाता. या गर्दीतुन वाट काढत आबा वाड्याच्या पुढच्या दरवाज्या पाशी आले, मनात तह्रा-तह्रांच्या विचारांनी गोंधळ घातला होता. सर्व विचार बाजुला करून त्यांनी वाड्यात पाऊल टाकला. त्यांचे लक्ष रखमा व पारू कडं गेल अनं आबांना बघताच त्या दोन मायलेकरांनी टाहो फोडला. त्यानी नजर आता पुढे टाकली अनं पायाखालची जमिन सरकली. ज्याला लहानाचा मोठा केला, वाढविले खेळवले त्याच मुलाचा नदीचा कालचा पुर त्याचा जीव घेऊन गेला होता. उभ राहण्यास आता धरणी कमी पडु लागली होती. आबा भिंतीला टेकुन होते आणि ते तसेच खाली बसले ते कायमचे. त्यांच्या मनात एकच विचार येत आसावा
"पाणी म्हणजे जीवन" का "जीवन म्हणजे पाणी"
आबा आता कायमचेच शांत झाले होते. सुर्याच्या तळपत्या ऊन्हात त्या बाप-लेकाचीं प्रेतांच्या आग्नीचे आता लोट उठत होते
           
         नागेश शेषराव टिपरे
        मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
        मो.नं:-८६००१३८५२५

माती

या माती मध्ये जन्मलो होतो
तिच्या मध्ये हसलो होतो, फिरलो होतो,
खेळलो होतो, रडलो होतो.
तिच्या सुगंधाचा अस्वाद घेत होतो
तिच्या अस्मितेसाठी आज ही लढलो होतो.
माती ती मातीच होती
माझ्यासाठी ती अभिमानी होती
जन्म हीच माती देत होती
मृत्यु नंतर हीच माती
लेकराला कुशीमध्ये घेत होती
हीच ती माती होती
माती ती माती होती
           नागेश शेषराव टिपरे
           मु.पो:-खडकी ता.दौंड
                      जि.पुणे
           मो.नं:-८६००१३८५२५

बहाणा

फोनवर कुठयं म्हणुन विचारले असता घरी म्हणुन सांगायचा
शाळेत जाऊन तो तिच्या गेटवर बसायचा
तिला पहाण्याचा त्याचा तो एक वेगळाच बहाणा असायचा....

चौकात चाललोय म्हणुन सांगुन जायचा
तिच्या घराच्या वळणावरती थोडा थांबायचा
तिला पहाण्याचा त्याचा तो एक वेगळाच बहाणा असायचा....

काम काय सांगीतल्यावर बाहेर आलोय म्हणुन सांगायचा
तीच्या मागे मागे रोज शाळेपर्यंत जायचा
तिला पहाण्याचा त्याचा तो एक वेगळाच बहाणा असायचा....

एकदा ती दिसेल म्हणुन नळावर माग नंबरला बसायचा
ती नळावर येताच पाणी देखिल भरून द्याचा
तिला पहाण्याचा त्याचा तो एक वेगळाच बहाणा असायचा....

गाडी पंमचर झाली म्हणुन हवा सोडुन द्यायचा
पंमचर काढतोय सांगुन वळणावरच्या दुकानात बसायचा
तिला पहाण्याचा त्याचा तो एक वेगळाच बहाणा असायचा....

कामावरती जाताना मात्र स्टॉप असायचा
तिथल्याच वळणावरती रोज-रोज दिसायचा
तिला पहाण्याचा त्याचा रोज एक वेगळाच बहाणा असायचा....

                             नागेश शेषराव टिपरे
                           मु.पो:-खडकी ता.दौंड
                                      जि.पुणे
                           मो.नं:-८६००१३८५२५

जात

जीला मी काळजाशी धरलं
तीनेचं मला माणुसकीतुन दुर सारलं
अभिमान केला होता मी तीचा
जीच्यात काहीच तथ्य नव्हतं
म्हणुन मला वाटलं का तीला कवटाळाव
मी म्हणुन तीला सोडुन द्यायच ठरवलं
माझ्या प्रमाणे ती पण लाचार झाली होती
पुढे मी, अनं मागे मागे ती येत होती
आयुष्यभर खिजवेल आशी ती जात होती
माणसातुन माणुस आता ती वेगळा करू पहात होती
आता मी सहन नाही करू शकत तीला
याची चांगलीच जाणिव होती मला
समाज्यातील ती एक द्वेष आहे
म्हणुनच मी जात विकत आहे
म्हणुनच मी जात विकत आहे
***********"******
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

मन

मन आजुन ही फिरत आहे
क्षणा क्षणाला झुरत आहे
किती वेळा समजावले या मनाला
तरी सुध्दा प्रेम तिच्यावर करत आहे
तिला विसरण्यासाठी,।,
लग्नाचा विचार केला,,,
बघाया गेलेल्या मुली मध्ये
हे बावळट मन ,,!
तिलाच शोधत आहे
अस वाटत मन तिच्यावर प्रेम करत आहे
प्रत्येक वेळेला आठवन तिची होत आहे
सांग ना देवा मला असे का? होत आहे,!
नको मला तिची ती आस
नको मला तो सहवास
मी पुन्हा सुरवात करत आहे
आता मन कोणावर तरी प्रेम करत आहे
तिला ते थोड-थोड विसरत आहे, 
तरी कुठेतरी आठवण,,,
अजून तिची,,,,,,
घर करत आहे,,,
******************

           नागेश शेषराव टिपरे
       मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
           मो.नं:-८६००१३८५२५

मान

आई तु म्हणजे आत्मा माझा
बाबा तुम्ही म्हणजे प्राण माझा

आई तु म्हणजे आठवण माझी
बाबा तुम्ही म्हणजे साठवण माझी

आई तु म्हणजे चित्त माझे
बाबा तुम्ही म्हणजे ध्येय माझे

आई तु म्हणजे विषय माझा
बाबा तुम्ही म्हणजे भाषण माझे

आई तु म्हणजे नदी
बाबा तुम्ही म्हणजे सागर

आई तु म्हणजे ज्ञानगंगा माझी
बाबा तुम्ही म्हणजे विश्वास माझा

आई तुझा शब्द म्हणजे होकार
बाबा तुमचे विचार म्हणजे सुविचार

आई तुझ्या शब्दाला "मान" माझा
बाबा तुमच्याच मानाला "प्राण" माझा
****************************
             नागेश शेषराव टिपरे
      मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
           मो.नं:-८६००१३८५२५