Thursday, 15 September 2016

तुटलेली नाती

का मी ती मैत्री केली
त्याच मैत्रीत पुन्हा तीच चुक झाली
कर्तव्य जबाबदारी आणि बांधीलकीची
मला नव्हती सवय या सर्वांची
मी काल पण अनं आज केली निस्वार्थ मैत्री
नाही करनार मी कुठलही अपेक्षा तुमच्याकडुन
कारण आपेक्षा आली की आला पुन्हा तो स्वार्थ
ठेवली होती मी फक्त एक इच्छा तुमच्या समोर
रागवा, हसा, चेष्टा ही करा पण मला मित्र समजा
पण नाही कधीच समजलो मी तुम्हाला अन तुम्ही मला
तुम्हीच म्हणाला होतात ना तु नाही तु नाही रे आमचा
तेव्हा मीच मला म्हणालो तु आजवर होता तरी कुणाचा
शब्दा शब्दा मुळे तुटली होती हीच ती नाती
आत्ता मावळत चालल्या होत्या त्या मैत्रीच्या ज्योती
                       नागेश शेषराव टिपरे
                      मु.पो:-खडकी ता.दौंड
                               जि.पुणे
                     मो.नं:-८६००१३८५२५

No comments:

Post a Comment