*""भरकटलेली युवा पिढी""*
भारताला स्वातंत्र होऊन जवळपास ७ दशके होत आली. तेव्हाचा भारत व आताच भारत या मध्ये जमिन अाभाळा एवढा फरक आहे. पुर्वीचे तरूण *इंक्लाब जिंदाबाद, भारत माता की जय* या सारखे घोषना देत असायचे. आई म्हाणायची मरायचंच आहे तर देशा साठी मर बायकां सारखा घरात बसायच असेल तर बांगड्या भर बांगड्या. अनं आताची या पोराला घरातुन बाहेरच येऊ देत नाही, समाज सेवा तर सोडा राव. तरी पण हे कार्ट गपचीप गाडी घेऊन गावातील गल्ली बोळानं हॉर्न वाजव हिंडतं. त्यावर *चायनाच्या* मोबाईल वर लावलेलं *शांताबाई, बाई वाड्यावर या* असली गाणी काय बंद करत नाही.
कधी कधी वाटतं तंत्रज्ञान कुठ गेलय. अनं खरच आपण या तंत्रज्ञाना बरोबर चालत आहोत का? शहरातील तरूणा बरोबर खेड्यातील ही तरूण काही मागे राहीले नाहीत. पण हे *दोन्ही तरूण तंत्रज्ञानाचा खरच योग्य वापर करतात का.* आजची युवा पिढी इंटर नेट मुळे कुठ तरी भरकटत चालली आहे. प्रत्येक युवा पिढी ही शारिरीक वासनेला बळी पडत आहे. ती एक शरीराची गरज आहे, हे मी मान्य करतो पण ते त्यासाठी काही वयोमर्यादा आहे. ज्या वयात मुलांच शिक्षण घेण्याच वय असतं त्या वयात ते पोरीला घेऊन फिरायला जातयं. ह्या युवा पिढीतील ७५% ते ८०% तरूण-तरूणी *पॉर्न क्लिप व वेब साईड* ग्रासलेली आहे. यातुनच युवा पिढीत वासनेची भुक निर्माण होते, अन हीच भुक भागली नाही तर *लैंगीक छळ, छेडछाड, बलात्कार* या सारखी कृत्य घडत जातात. याच वासनेला बळी पडुन तरूण-तरूणी याच्यातील अनैतिक संबध. मग काळ मानगुटीवर येऊन बसल्या सारखा *एच आय व्ही* सारखे रोग झपाट्याने वाढत आहेत.
वाढत्या लोकसंखेत हा *एच आय व्ही* हा सुद्धा तेवढ्याच वेगाने वाढत आहे. हा वाढण्याचे कारण म्हणजे *पेशा ने वैश्या व्यवसाय* करणारी नसुन *समाजात प्रतिष्ठीने रहाणारी तुमच्या आमच्या सारख्या व्यक्ती आहेत* आपणच कित्येक बाहेर अनैतिक संबध ठेवतो व *लाज वाटते* म्हणुन त्याची दक्षता घेत नाहीत. मग आपल्या पेक्षा त्या *वैश्या* बऱ्या नाहीत का किमान त्या या रोगावर उपाय नाही म्हणुन त्या आहे त्या उपाय योजनेचा अवलंब तरी करतात.
प्रत्येक देशाचे भवितव्य हे त्या देशातील तरूण पिढीच्या खांद्यावर असते. पण; आपले देशात तर सर्वात जास्त आहेत पण हे *व्यसन, वासना, स्वार्थी पणा, पैशावरील अती प्रेम* याच्या अधिन झाले आहेत मग आपल्या देशाचे भवितव्य तरी काय असेल या गोष्टीचा विचार तरी मनात आला तरी चिंता वाटु लागते.
*स्वामी विवेकानंद* म्हणाले होते *मला सामर्थवान व धैर्यशाली १०० तरूण द्या मी देशाचे भवितव्य बदलुन दाखवतो* पण *सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आज ही आशे १०० तरूण भेटले नाही ही एक सर्वात मोठी शोकांकीता आहे*
जय हिंद
🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश टिपरे *@९१*
My dear Buddy today first tym i was visit your blockpage and I am really proud of u baba this article is very nice such inspiring well done keep it up may God bless u
ReplyDeleteUr brother in christ
*José Tushar gaikwadi*