Tuesday 17 January 2017

तो, मी व वृद्धाश्राम


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अनुभव कथा
तो, मी व वृद्धाश्राम
➖➖➖➖➖➖➖➖➖
                त्या वेळस मी दुसऱ्या वर्षाच्या वाणिज्य शाखेची परीक्षा दिली होती. वय २० वर्षे होऊन सुद्धा माझ्यातला अल्लड पणा काही गेला नव्हता. परीक्षा संपताच आमचा क्रिकेट चा खेळ सुरू व्हायचा. त्या वेळेस मात्र थोडा बदल होऊन मी क्रिकेट मधे पंच म्हणुन कामगीरी करू लगलो होतो. पुर्वी या घटनेचा जास्त नाही पण थोडा फार अनुभव आला होता. पण s.y च्या वर्षी पंचाची भुमीका करणेच मला योग्य वाटु लागले.
                मज्जा अन मोबदला या दोन्ही गोष्टी मिळत असल्याने मी हा मार्ग पत्करला होता. त्या दिवशी मला जवळपास रात्री ९:३० च्या सुमारास कराड जवळील एका खेड्यातुन मला आयोजकांचा फोन आला. त्यांच्या शी बोलताना त्यांनी मला दोन दिवसांनी होणाऱ्या अंतिम सामन्याची कल्पना दिली अन मी त्या सामन्याचे पंच म्हणुन कामगीरी करावी असे अाव्हान केले. मी ही सहाजिकच हो म्हणालो. अन न राहुन मी त्यांना विचारलं अंतिम सामन्या साठी माझा सहकारी कोण आहे.
त्यांनी ही हसत हसत उत्तर दिलं तुमचा जुनाच सहकारी.
   मी अश्चर्याने विचारले सौरभ का?
आयोजक हो म्हणताच मी कॉल कट करण्याची घाई करत "काम आहे नंतर कॉल करतो" म्हणुन फोन कट केला. अन तेवढ्याच घाईत सौरभ ला कॉल केला. त्याला ही त्या सामन्या साठी त्याची  निवड झाली म्हणुन बातमी आधीच दिली गेली होती. पण मी त्याचा सहकारी हे समजल्यावर  तोही ह्या बातमी ने खुप आनंदी झाला होता. जवळपास दीड वर्षे दोघे ही एकच पंच म्हणुन काम करत असुन आम्हाला आज पर्यंत एकदा ही एकत्र काम करण्याची संधी मिळाली नव्हती.
                या धावपळीच्या जीवनात वेळे बरोबर चालने हे मला सौरभ ने शिकवलं होतं. त्याच गुणा मुळे आज ही कुठ्याल्याच ठिकाणी कमीत कमी तर माझ्या चुकी मुळे तर उशीर होत नाही. त्या दिवशी ठरल्या वेळे नुसार बारामतीतुन सकाळी कराड ची पहिली बस पकडायची याचे आम्ही नियोजन केले होते सामन्याची वेळ ही दुपारी ०३:०० ची होती.
                  मी ही शासकीय वसतीगृहातील रहात होतो. त्यामुळे जास्त नाही पण थोडीशी बंधने ही असायची. पण सर्वसाधारण पणे सर्वांची परीक्षा संपल्या मुळे बंधने तशी कमी झाली होती. मी ही वेळातच झोपी गेलो. करण दुसऱ्या दिवशी मला लवकर निघायच होतं. मी ४:१५ चा गरज लावुन झोपी गेलो.
                   सकाळी सकाळी गोड झोपेतच गजर वाजला. गजर बंद करून, मी या अंगावरून त्या अंगावर होत आळस देत तसाच १५ ते २० मिनिटं पडुन राहिलो. पडल्या पडल्या सौरभ ला फोन केला. पहिली रिंग वाजतेय की नाही तोपर्यंत त्याने फोन उचलला.
     मी उठलोय का पाहण्या साठी फोन केला ना? असा त्याने प्रश्न केला.
    मी नाही नाही म्हणालो. लवकर उरक सांगण्या साठी फोन केला म्हणत विनोदी प्रतीउत्तर दिलं.
                     माझं सर्व काही आवरून मी चौकातच चहा घेतला. बरोबर ०६:०० वाजता MIDC चौकात ०६:१५ च्या बसची वाट पाहु लागलो. रोज वापरात येणारा कॉलेज पास दाखवला. सकट मामांनी(कंडक्टर) नेहमी प्रमाणे पास पंचिंग करू का विचारलं. थोडंस स्मिथ हस्य करून
     करा करा आज नाही जाणार परत
म्हणालो
     का रे! कुठ दौरा निघालाय का,
     हो मामा
     कुठं
     कराड ला म्हणत मी पास खिश्यात घातला
         बोलता बोलता कधी तीन हात्ती चौक निघुन गेला हे समजलं सुद्धा नाही. मी स्टंड वर उतरून सौरभ ची वाट पाहु लागलो. बघता बघता एक तास निघुन गेला पण तो काय यायचा पत्ता दिसेना, म्हणुन मी त्या परत कॉल केला. पण आता कॉल ही बंद येत होता. मला वाटलं रेंज चा प्रोब्लेम असेल पण बरोबर ७:४५ च्या सुमारास त्याचा कॉल पहिल्यांदा बंद आला होता. त्या नंतर मी त्याची वाट पाहुच लागलो. एकट्याला काही करमणुक होईना म्हणुन मी राधाला कॉल केला. कॉल घेताच तीने मस्करी चालु केली.
     का रे आमची आठवण येत नाही का
     तस नाही गं
     मग कसं
     येते गं आठवण
     कुठं पर्यंत पोचलास
      बारामती स्टंडवरच आहे अजुन
      का.....?
      सौरभ नाही आला आजुन
      गप रे नको खोट बोलु
      खरचं गळ्या शपथ!
      तु काय कशाची पण शपथ घेशील
      मैत्री शपथ
      खरच म्हणतोस
      मग काय चेष्टा करतोय
      एकटाच आहेस
      हो म्हणुन तर कॉल केलाय
       थांब आलेच
       येताना रूद्रला पण घेऊन ये
      तो बाहेर गेला आहे
      बरं बरं मी बघतो कुठय तो
      मी तो पर्यंत रूद्राला कॉल केला. पण तो सकाळीच पुण्याला गेला होता. कसब्या पासुन बारामती स्टंड ला येण्याला पाच मिनीट ही पुरेसे आहेत. मी रूद्राचा कॉल ठेवतो का नाही तो पर्यंत राधा माझ्या पाशी पोहच झाली. तीला बोलत बोलतच मी पुन्हा सौरभ ला कॉल केला. पण तो पुन्हा बंदच येत होता. आता मात्र माझी चीडचीड होऊ लागली.
     "का रागवतोस त्याच्यावर" राधा म्हणाली
     ही काय वेळ झाली का यायची
     काय काम निघालं असेल
     पण काय ठरलं होतं आमचं
     हो पण.....
     काय तु पण त्याची बाजु घेतेस
    'तस नाही रे' पण तो वेळेचा खुप पाबंदी आहे
     हो मला ही माहीत आहे पण का येत नाही हे पण समजेनाय
      अरे तो तो आप्पानां भेटायला वृद्धाश्रामात गेला आसेल
     हो हो मी पहातो लगेच कॉल करून
     मी लगेच वृद्धाश्रामात कॉल केला.
कॉल करताच कॉल ही लागला, पण पहिल्यांदा कोणीच उचलला नाही. मी पुन्हा एकदा प्रयत्न केला. या वेळेस मात्र लगेच शिपाई काकांनी फोन उचलला.
    हॉलो... काका नागेश बोलतोय
    बोल ना भैय्या
    काका सौरभ आलाय का
   हो आलाय
    त्याला म्हणाव उशिर झालाय चल लवकर!!!
    भैय्या तो काय यायचा नाही बघ.....
    का हो काका?
    आप्पा जास्तच आजारी आहेत.
    का? काय झालंय त्यांना
    काय झालय तेच कळानाय
    दवाखान्यात नेलं होतं का
    हो... पण परत पाठवलं
    का......?
    जवळच्या माणसाना बोलवा म्हणाला डॉक्टर
    अनं हे तुम्ही आता सांगताय
    आप्पाच म्हणाले कुणाला काहीच नका सांगु
    मग सौरभ कसा काय आला
    अचानक आला भैय्या
    बरं बरं मी पण येतो तिकडं
                 तो पर्यंत राधाने घरची मोठी गाडी मागवुन घेतली व जाण्याची तयारी केली. बारामती स्टंड ते वृद्धाश्राम जास्तीत जास्त सव्वा तासाचा रस्ता. अनं एकदाची गाडी सुरू झाली. मला ही कधी जातोय असं झालं होतं. गाडीत बसल्या बसल्या मला आप्पांच्या काही आठवणी आठवु लागल्या.
               आप्पा..... आप्पा म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व होतं त्या गावतलं. लहाना पासुन थोरा पर्यंत प्रत्येकांच्या तोंडात दिनकर आप्पांच नाव असायचं. अनं ते ही आदराने घेतलं जायचं. पण एकुलत्या एक मुलाचं लग्न केलं, अनं मुलगा बायकोचा एवढा आधिन झाला की दावणी बैल तरी बरा. त्यामुळे आप्पांची व्यथा सुनेने फिरस्थी कुत्र्या पेक्षा काय वेगळी नव्हती. त्या वेळेस मात्र आप्पाना आत्मसन्मान आडवा आला आणि आप्पांनी सर्व धन दैलत सोडुन आंगावरील कपड्यानीशी घर सोडलं. ते थेट वृद्धाश्रामात आले.
                  सौरभ व त्यांची ओळख ही पण त्याचं दिवशी बस मध्ये झाली होती ज्या दिवशी आप्पांनी घर सोडलं होतं. सौरभ हा पण एक अनाथ होता. म्हणुन त्याला आप्पांची कहाणी काळज हेलावणारी वाटली. दिनकर रावंना आप्पा हे नाव पण सौरभनेच दिलं होतं. त्या दिवशी सौरभ ने आप्पाना मी दर आठवड्याला होस्टेल वरून सुट्टी काढुन भेटायला येत जाईल असं वचन दिलं. त्या वेळेस मात्र या गोष्टीची आप्पाना फक्त हे आपलं सांत्वन आहे असं वाटलं
                   वृद्धाश्रामात येऊन दोन-तीन दिवस गेले होते. पहिल्याच रविवार च्या दिवशी आप्पा सकाळच्या ऊन्हात बाकड्यावर बसुन कसला तरी विचार करत होते. एवढ्यात ज्या प्रमाणे सौरभ ने आप्पानां वचन दिल होतं त्या वचनाला ऋणबंद राहुन सौरभ वृद्धाश्रामात पोहचला व आश्रमाच्या गेट मधुन आत वळाला.
    नमस्कार आप्पा म्हणत त्याने आप्पांचे चरण स्पर्श केलं
    आ रे सौरभ. ये ये बस शब्दाला जागलास म्हणायचं
    तसं नाही आप्पा तुमच्यात मी माझ्या वडीलां बघीतलं. मी तर अनाथ, आई-वडील काय असतात हे तर माहीत नाही. जन्म कोणी दिला हे ही माहित नाही; म्हणुन थोडी जास्तच आपुलकी वाटली
   बर बर म्हणत आप्पांनी सौरभ च्या केसातुन हात कुरवाळत फिरवत होते. अनं थोडेे पाणावले डोळे पुसले.
     मला वाटलं शक्यतो त्यांना त्याच्या मुलाची आठवण आली असावी.
               गाडी चालु असताना मला हे सर्व काही सौरभ व आप्पांचा मी पाहिलेला प्रसंग मला आठवत होता. या तंद्रीत कधी वृद्धाश्राम आलं हे समजलं ही नाही. राधाने मला हालवुन जाग केलं.
   नागेश ऐ नागेश !!! आपण आलो वृद्धाश्रामत
   हो हो म्हणत मी गाडीतुन उतरलो
   तु पुढे हो मी गाडी लावुन येते म्हणत राधाने गाडी समोरील हिरव्यगार आंब्याच्या झाडाखाली लावली. मी उतरून समोर बघताच, समोर तर भकास भकास वातवरण वाटत होतं. आप्पा बसायचे ते बाकडे पण ओस पडल्या सारखे वाटु लागले. मला एकट्याल काय आत पावले टाकु वाटत नव्हती, म्हणुन मी राधाची वाट पाहु लागलो. राधा येताच आम्ही दोघ ही घाईतच तड तड पावले टाकत आत शिरलो. आत शिरताच आप्पा राहत्यात त्या खोली कडे वळालो. सर्वत्र भयान शांतता पसरली होती. शिपाई काका दरवाज्याच्या तोंडालाच आतुन उभा होते. तर आप्पांचे आश्रमातील मित्र हिरमुसलेल्या चेहऱ्याने त्यांच्या आवती भवती बसले होते. सौरभ आप्पांचा उजवा हात आपल्या हातात घेऊन त्यांच्या जवळ बसला होता. आम्ही येताच त्याने बसुनच फक्त एकदा एकटक नजर आमच्या कडे टाकली. मी व राधा ही आप्पांना झोपवलेल्या खाटेच्या दुसऱ्या बाजुला बसलो. आप्पानी ही सुकलेल्या डोळ्यानीच मला व राधाला जवळ बोलावलं. अनं बसक्या आवाजातच बरे आहात का विचारलं. आम्ही दोघांनी ही होकार्थी मान हालवली. थरथर कापणारा आप्पांनी त्याचा हात आमच्या दोघांच्या डोक्यावरून फिरवला.
    अनं म्हणाले "आज खरचं मी आनाथ किंवा वृद्धाश्रामात आहे असं मुळीच वाटतनाही." आता सुखाने तुम्ही आहात तोपर्यंत मरण आलं म्हणजे बरं झालं. म्हणत त्याचं हृदय भरून आलं
     'असं का बोलताय आप्पा'
      रडक्या आवाजातच सौरभ पुटपुटला.
      लेकरा या पेक्षा आजुन काय वेगळ सुख पाहिजे. असं मरण तर नशिबवान माणसाला येतं.
      पण आप्पा मला तुमची गरज आहे. नाही तर मी खरच आनाथ होईल.
      लेकरा एक ना एक दिवस या जगातुन प्रत्येकाला जायचंच आहे.
       तुम्ही बोलु नका आप्पा शांत पडुन रहा
       जस मला बस मध्ये तु एक वचन दिलं होतं तसं आज ही एक वचन दे सौरभ
      कोणतं आप्पा
      मी गेल्यावर ही तु या वृद्धाश्रामात पहिल्या सारखाच येत जा......
     हो आप्पा दिलं वचन मी येत जाईल
             सौरभ ने आप्पांचा हात हातात घेत आप्पांना वचन दिलं. वचन देताच एक स्मिथ हस्य केलं. अनं आप्पाच्या काळजात शेवटची तीव्र कळ निघाली.
      सौरभ....... म्हणत आप्पांनी सौरभचा हात आपल्या हातानी जोरदार पणे दाबला. अन त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
          आप्पा..... आप्पा...... नावाचा एकच आरडा ओरडा चालु झाला. सर्वच ढसढसुन रडत होते. रडत रडतच काका बाहेर पडुन त्यांनी अंतिम संस्काराची तयारी चालु केली. सौरभच ही मन गहिवरून आलं होतं, त्याने आजुन ही आप्पांचा हात सोडला नव्हता. डोळ्यातुन आश्रु गाळत होते पण त्याच्या तोंडातुन शब्द ही बाहेर पडत नव्हाता. मी माझी इच्छा नसतान ही नाईलाजाने त्यांच्या मुलाला दुसऱ्या कडुन निरोप पाठवला. अन तो निरोप ही त्याला काही क्षणातच मिळाला ही. दुपारचे सुमारे तीन वाजले असती. आनं आम्ही त्यांच्या मुलाची वाट पाहु लागलो. वाट पहाता पहाता सुर्य मावळतीकडे पुर्ण पणे झुकला. त्याची तीव्रता ही कमी झाली होती. शेवटी काही वृद्धाश्रामातील वृद्ध म्हणाले जो गेल्या आडीच वर्षात एकदा पण आला नाही तो आज तरी कशावरून येईल.
         शेवटी काका म्हणाले सौरभ तुच त्याच्या साठी सर्व काही होतास तुच पाणी पाज. उशीर करण्यास काही अर्थ नाही.
                    आम्ही तिघे व वृद्धाश्रामातील वृद्ध व जवळील काही जाणती माणसं सर्वसाधारण ५० जणानीच मिळुनच आप्पांची अंत्ययात्रा काढली. स्मशानभुमीत ही सर्व विधी उरकली व सौरभ च्या हातातत काकांनी पेटता डेंबा दिला.
    सौरभ मुख अग्नी दे.... सौरभ दे मुख अग्नी
                     थरथत्या हातांनी सौरभ ने आप्पांच्या सरणाला आग्नी दिली. सुर्य निम्मा मावळला ही होता. त्या वेळेस सुटणाऱ्या हावेच्या झुळकेने सरण धडधड पेटु लागले. काही वेळेतच धडडडडकीनी कवटी फुटल्याचा आवजा झाला. सर्व जण माघारी चालु लागले. अनं एकदाचा गप्प बसलेला सौरभ मात्र माझ्या गळ्यात पडुन ओक्सा बोक्शी काळीज फाटेल असा रडु लागला.
       आज एक अनाथ पुन्हा एकदा अनाथ झाला होता......
***********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
        जि.पुणे
मो.नं ८६००१३८५२५

No comments:

Post a Comment