Saturday, 4 November 2017

10

जा जा फुला
सांगतो मी तुला
हवा आहेस तु तीला
पोहताच निरोप दे मला...

नागेश

Sunday, 15 October 2017

प्रिय मित्रा

प्रिय मित्रा,
                बरेच दिवस झालेे आपली भेट झाली नाही.  अनं आपण भेटलो ही नाही, ज्या प्रमाणे मला तुझी आठवण येते त्या प्रमाणे तुला ही येत असेल.  मी तुला सोडुन आलो, यात माझं बरच काही चुकलं आसेल.  पण यातच आपल्या सर्वांच हीत आहे याची कल्पना करून मला हे पाऊल उचलावं लागलं. तुझ्या पासुन आल्यावर कसल्या कसल्या संकटांना मला एकट्याला सामोरे जावे लागले. अनं मी त्यां तोंड देण्याचा प्रयत्न ही केला.  जसे एखादी तुफान लाट यावी अनं एखाद्या खडकाला धडकीनी धडकावी आणी त्याच्या त्या प्रहाराने पाणी चौफेर भिर्रर्रकले जावेत. त्या उडणाऱ्या पाण्यापासुन होणाऱ्या थेंबांची अन माझी गत काय वेगऴी नव्हती. पण आता कुठ तरी स्थिरावत आहे. तुझ्या पासुन आल्यावर खऱ्या अर्थाने स्वार्थी दुनिया पाहीली.  फक्त अनं फक्त स्वता:चा विचार करणारी लोकं याचं दुनिये सध्यातरी वास्तव आहे.  म्हणुन जरा पुर्वीचे दिवस आठवले.  पैशासाठी नाही तर एकमेकांच्या जीवा साठी जगलो.  अनं आज ही हा असाह्य दुरावा सहन करत तु अनं मी जगत आहे.  खऱ्या दुनियादारीची सुरवात आता कुठेतरी होत आहे.  प्रत्येकजण रूबाब दाखवण्या प्रयत्न करतात. मग खचतो मी ही कधी तरी.  लोखंडाचा नाही ना मी, मी ही शेवटी हाडा-मांसाचा एक माणुसच ना. कधी कधी माझी ही मनस्थिती बिघडती रे. पण करणार तरी काय आपलं असं म्हणारं आहे तरी कोण. जेवणाच्या डब्याकडे पाहीले की तुझी आठवण येते आणी तु येशिल असा क्षणभर भास होतो अनं हातातील घास हातातच राहतो. आठवतो मग तु भरवलेला क्षण. एक तीळ सात जणांनी खल्ला होता हे वाक्य आठवते अनं काही क्षण विरंगतो भुतकाळात. मग बसतो एकांतात क्षणभर त्या चहा च्या टपरीवर. तेव्हा खरच माझं मलाच मी अनाथ असल्या सारखं वाटतं रं. मग फक्त तो रीकामा चहा चा ग्लास सोबतीला. यदा कदाचित आश्रु ही ओघळत असतील कधी. मग माझेच मी पालथ्या हाताने आश्रु पसण्याचा असाह्य प्रयत्न करतो. अनं पुन्हा त्याच दुनियादारीत सामील होण्याचा प्रयत्न करतो. आपली माणस; आपली माती; अनं काळजातीलं नाती सोडुन आल्या बद्दलं. मग मन ही मन कधी कधी पश्चाताप ही करतो. सकाळी ज्या सुर्याची मी आतुरतेने वाट पाहीचो त्याचीच मी आजकाल मावळतीला आतुरतेने वाट पाहत असतो कारण तो कमीत कमी माझ्या दुख:त तरी सामील होतो. आशातच रात्र ही जाते. प्रत्येक संकटात,  सुखात, दुख:त, आनंदत तुझी पहिली आठवण येते.
        मग थरथरत्या हाताने एकांत रात्रीला लिहितो मनातले भाव. अनं ओघळतो एकांतात पुन्हा आश्रु.
जेव्हा कधी भावना अनावर होतील तेव्हा
पुन्हा आसचं एक पत्र लिहिणं आशाचं एका रात्री..............
   कळावे,
तुझाच मित्र.
🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड जि.पुणे
8600138525
दि. 15/16 अॉक्टोबंर 2017
रात्री 2:19 मिनिटे

Saturday, 30 September 2017

9

सांग हे देवा
माझा पिल्लु कस असेल
घरी मला पाहुन
ते खदळेनं, अनं हसेल...
:-नागेश टिपरे
  ८६००१३८५२५

Wednesday, 30 August 2017

🌿🌷🌿🌿🌿🌷🌿🌿
वाऱ्याची ती झुळुक येता
फुलपाखरू हे फिरतय
फांदीवर नाजुक फुल डोलंता
त्याच्या संग माझं ही मन झुलंतय
                          *नागेश टिपरे*
🌿🌿🌿🌿🌷🌿🌿🌿

तू माझी अर्धांगिनी

तू माझी अर्धांगिनी

मैना म्हणुन बोलुन गेली
आण्णा भाऊंची वाणी
तीशीच जरा आहे गं
तू माझी अर्धंगिनी

सुख दुखा:त दिली साथ
जळते जशी दिव्याची वात
त्या हृदयाची तु आहेस राणी
तु माझी अर्धांगिनी

तुच माझी राधा तुच माझी मीरा
माझ्यासाठी तु एक कोहिनुर हिरा
संसार आपला या सदनी
तू माझी अर्धांगिनी

दाखवु जगाला प्रेमाची गाथा
कधी खड्डा तर कधी येईल माथा
कर विचार तु हा मनो-मनी
तु माझी अर्धांगिनी

मृत्यु नंतर नको स्वर्गाच्या दारी
मानव जन्माची पुन्हा घडो वारी
करतो पुन्हा हीच ईश्वरचरणी मागणी
असावी तुच माझी अर्धांगिनी

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी ता दौंड जि पुणे
+918600138525
nageshtipare@gmail.com

Friday, 28 July 2017

मी माझी बहिण गमवली असती


सत्य घटना
(माझी बहिण वहान दुर्घटनेतुन वाचल्यानंतर)

*मी माझी बहीण गमवली असती*

काल दुपारी खुप आखरीत घडल असतं
त्यामुळं माझ सर्व घरदार रडलं असतं
काळाच्या ओघात जर वेळ दडली नसती
त्यात मी माझी बहीण गमवली असती

रक्षाबंधना दिवशी तुम्ही खाल्ला असता पेढा
मी मात्र झालो असतो रे वेडा
दिशा काही जर योग्य घडली नसती
तेव्हाच मी माझी बहीण गमवली असती

हातात नसता माझ्या आज राखीचा धागा
काळजाला पडल्या असत्या अगणित भेगा
मदतीला ती व्यक्ती धावली नसती
तर मी माझी बहीण गमवली असती

तुमच्या कपाळी तुम्ही लावले असते चंदन
आम्ही मात्र केले असते तिला शेवटचे वंदन
हे देवा जर तुझी पुण्याई प्रकटली नसती
तर मी माझी बहीण गमवली असती
*********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

Monday, 3 July 2017

तीर्थक्षेत्राचे वास्तव: पावित्र व स्वच्छता

तीर्थक्षेत्राचे वास्ताव पावित्र आणि स्वच्छता

                     तस पाहायला गेलं तर आपल्या भारत देशात खुप सारे देव व तीर्थक्षत्र आहेत.  ज्या काळी आपल्या देशाची लोकसंख्या काही कोटीच्या आसपास असेल त्या आधी पासुन आपल्या देशात म्हणे 33 कोटी देव गाईच्या अंगात असतात. ज्या उद्देशाने हे पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण झाली किंवा निर्माण केली गेली याचा या आताच्या समाजाला काही उपयोग नाही. याचा उपयोग फक्त पिकनिक स्पॉट म्हणुन केला जाते.  प्रेमी जोडप्यांनी तर त्या पवित्र क्षेत्राची ची तर पार वाट लावुन टाकली आहे.  जे चार भिंतीच्या आत व्हायाला हवं ते हे आशा ठिकाणी करतात.  वरून बोलायला मोकऴे होतात की आमचं प्रेम राधा-कृष्णाच्या प्रेमा सारखं पवित्र आहे.  त्याचं हेच प्रेम फक्त वाढदिवसाला गिफ्ट घेतलं नाही म्हणुन क्षणात तुटलं जातं त्यांच हे पवित्र प्रेम.
             या पवित्र तीर्थक्षेत्रात स्वच्छता फार लयाला लावली आहे. दऱ्या खोऱ्यातुन वाहुन येणाऱ्या ज्या गंगा नदी चं पाणी पिल्यावर सगळी पाप धुवून जायची अस आजी आजोबा सांगायची त्याचं गंगेच्या आज काठावर ही जाऊ वाटतं नाही. आशी पावित्र तिर्थक्षेत्र आमच्या देशातात आहेत अनं आम्ही काय केलं या पावित्र्याचं हे पाहुन स्वता:ची लाज वाटते.  य़ाच खेड्यापाड्याची शहरांची सर्व घाण गंगे सारख्या पवित्र नदीत सोडली जाते. या पाण्यात पुर्वी शरीराला पोषक आशी खनिज द्रव्य असायची पण आता त्यात जीव-जंतु आढळतात.
          वारी, कुंभमेळा, यात्रा नैवद्य,  हळद कुंकु , प्राणबळी हे कृत्य केल्याने देव कधी पावणार नाही.  उलट त्याचा कोप होईल. मग घडते एखादी मांढरगढावरील घटने सारखी घटना.
           मग कधी कधी पडतो माझ्याच मनाला विचार,  हे धार्मिक तीर्थ क्षेत्र बनली असलतील तरी कशाला. मग याच्या मागचा हेतु तरी खरच साध्य होतोय का????  समजाला  याची खरच गरज आहे का आणि ती कशासाठी ??तीर्थक्षेत्र हे काही फक्त मनोरंजनाची ठिकाणे होऊ नयेत . त्याच्या स्वच्छेतेची, सुंदरतेची , पावित्र्याची निसर्गरम्य वातवराणाची एक अदर्श व्हावा.

मग मन प्रसंन्नतेसाठी ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी कसं, प्रसंन्न, वाटावं,  मग ते देऊळ असो या मशिद या चर्च.

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी ता.दौंड
जि. पुणे
8600138525