मनात माझ्या खुप होती नाती
जपताना होती त्याच्या काळजाची माती
मातीची ही झाली रेती
वाय्रा सह ती उडुन जाती
उडता उडता गगनाला भिडाली
गगन म्हणाले विखुरली सारी
विखुरलेली नाती रडु लागली
स्वतःच ह्रदय ते बडवु लागली
ह्रदय त्याना सांगु लागलं
घडलेली हाकीकत ते गिरवु लागलं
गिरवलेली हाकिकत खुप होती खोल
नात्यांच तेव्हा कळलं मोल
*******************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
Thursday, 15 September 2016
विखुरलेली नाती
समाज आमचा बदलत होता
चाली-रीती बदलल्या होत्या; पद्धत ही बदलली होती,
फॉशन च्या युगात कपडे सुध्दा बदलली होती.
बदल घडवनाय्राना मात्र समाज दोष देत होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.
भ्रष्टाचार करून भ्रष्टाचारलाच कोसत होता,
प्रत्येक्षात मात्र हाच जातीभेदा ला पोसत होता.
तंत्रज्ञानाच्या युगात हा ही एक; बदल घडत होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.
आज ही येथे संस्कृतीचा पगडा होता,
अंध बनुन त्याच संस्कृतीला पायाखाली तुडवत होता.
देव ही ईथे आता सैतानच झाला होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.
स्वर्थापोटी हाच समाज आज ही वनवन फिरत होता,
स्पर्धेच्या जगात स्वतःला गती देण्याच काम करत होता,
कसली गती? अन कसले काय?
त्याचे फक्त ढोंग रचत होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.
येथे तंत्रज्ञाना पेक्षा अंधश्रधेवर जास्त विश्वास होता,
त्यामुळेच समाज काही केल्याने बदलत नव्हता.
अरे!!! आम्हीच बदललो नव्हतो तर समाज कसा बदलणार होता,
आम्ही फक्त म्हणत होतो समाज आमचा बदलत होता.
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
या समाजात वावरताना
भावासाठी भाऊ जीव देत होता
भावाचा जीव भाऊ घेत पण होता
धन-दौलतीचा मांडव उभा केला जात होता
हे ही पाहिलं कलीयुग असताना
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
कधी कुणाकडुन इथे आब्रु ही वाचवली जात होती
आब्रु लुटणाय्रांची बीजे ही इथेच पेरली जात होती
त्यांची मात्र समाज पुजा करीत होता
आम्ही ही लाचार झालो होतो
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
माणुसकी नावच एक गाव आजही जपलं होतं
जाती-धर्माच भांडण पण इथेच लावल जात होतं
यालाच लोकशाहीने राजकारण असं म्हंटल होतं
नाव मिळवण्यासाठी हे ही इथ चालत होतं
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
मित्र मित्राला अतुट आशी साथ देत होता
समाज त्यामध्ये ही आता फुट पाडु पाहतं होता
आक्रोश आज ही इथे सुरूच होता
हे सुध्दा पहावं लागल
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
समाजा सारखा समाज राहीला नव्हता
आपमतलोभी पणाचा चटका लागला होता
विश्वासाला पण तडा दिला जात होता
म्हणुन पुढे येण्यास कोणीच धजावत नव्हता
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
खचलेला मदतीचा हात मागत होता
आत्महात्यास कारणीभुत हाच समाज होता
पिताच मुलाच्या प्रेताला आग्नी देत होता
आता आश्रु सुध्दा वाहु लागले होते
या समाजात वावरताना;
या समाजात वावरताना.
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
मरण पाहिजे
आयुष्यात मला काही तरी नविन पाहिजे
नाही तर मला मरण पाहिजे
जनावरा सारखे सगळेच जगतात
मला माणुस होऊन जगले पाहिजे
नाही तर मला मरण पाहिजे
जीवन आज पर्यंत कुणाला समजले नाही
मला मरणाचे सत्य समजुन घेतले पाहिजे
नाही तर मला मरण पाहिजे
जीवन शेवटी एक प्रवास
या वाटेवर मला चालले पाहिजे
नाही तर मला मरण पाहिजे
झालेल्या चुकीला माफी
ह्रदयात फक्त प्रेम पाहिजे
नाही तर मला मरण पाहिजे
नाही तर मला मरण पाहिजे
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
मित्रा
आठवतात मला साऱ्या खुणा
तुझ्या शिवाय आहे मी सुना
ये मित्रा येशिल का पुन्हा
दुसऱ्यांच्या सांगण्यावरून
जगन झाल आपल कडु
आपल्या दोस्तीचा देठ कसा वाटला रे खोडु
पुन्हा खेळ मांडु
पण पुन्हा नको भांडु
खेळ हा ह्रदयाचा नको मोडु
तुझी माझी होती एकच वाट
त्याच वाटेवर मांडु आपला थाट
त्या तुझी हवी मला साथ
मैत्रीची आपल्या वेगळी असावी रीत
दाखवु जगाला तुझी माझी प्रीत
शब्दांबरोबर नको असा रडु
चुकलोय मी म्हणुन नको रे दडु
तुझ्या बरोबर जगण नाही
ते का जीवन व्हाव
नसेल तुला मान्य
मग जीवन का जगाव
तुझ़्या आधी मरण तरी याव
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
चल ना साळत जावु
चल ना
आपुन साळात जावु
लय लय शिकु
मोठ मोठ होवु
बाप नाय तुला
बाप नाय मला
दुख याच आता
सांगतु तरी कुणाला
चल ना
आपुन साळात जावु
साळत म्हणत्यात
लय आसती मज्या
मास्तर भी देतोय
कधी कधी सज्या
तरी पण
आपुन साळात जावु
दप्ताराच ओझ
आन कागदावर लीहु
पैस नाय म्हनुन
चार बुक कमी घीवु
चल ना
आपुन साळात जावु
साळा सुटल्यावर
मिळल ते काम करू
पाणी भरू, धुणीभांडी करू
दिल्याली भाकरी खाुु
चल ना
आपुन शाळात जावु
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
भेट
गोष्ट होती खुप मोठी
जुळनार ह्रदययाची नाती
भेटण्यास ती येणार होती
त्या तुडुंब भरलेल्या नदीच्या काठी
पडतील मग नजर-नजरेच्या गाठीभेटी
भाव दाटतील थरथरत्या ओठी
वेळ वाटु लागेल थोडीसी छोटी
निरोप घेतील मग आपुलकीच्या पोटी
निरोप घेतील मग आपुलकीच्या पोटी
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५