Sunday, 13 November 2016

क्षण

*"""""""""""क्षण""""""""""*
***********************
हातात तीचा हात हवा होता

रहीला मात्र तो काहीच क्षण

वाहीले आश्रु मन ही मन

लिहीली कविता मग

आठवल्या तिच्या आठवणी संग

जुन्या प्रेमाचे भुतकाळातील क्षण

कसे राहीले तिच्या वीना मन

पाहिले त्या कवितेकडे मग

पाहीले तिच्याकडे काही क्षण

खचले पुन्हा एकदा मन

रेतीवरी पाहुन कविताचे क्षण

लाटे बरोबर पुसली कविता

भरून आले माझ मन

**********************

नागेश शेषराव टिपरे

मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे

मो.नं:-८६००१३८५२५

Saturday, 12 November 2016

स्पर्धा

गुरफटलीय युवा पिढी
करते आहे ती स्पर्धा
होतात ते बेधुंद विजयाच्या नशेत
मग; हीणवतात दुसऱ्याला मागे राहीलास तु मर्दा

आजकाल प्रत्येकालाच
करावी लागते आहे स्पर्धा
प्रेमची स्पर्धा, भक्ती मध्ये ही स्पर्धेा
खाण्या पिण्याची स्पर्धा
विचार मांडण्याला ही स्पर्धा
माणुसकी बनुन राहीलीय स्पर्धा.

राजकारण ला स्पर्धा
समाज सेवाला स्पर्धा
शिक्षणात स्पर्धा
लाजीरपणा तर तेव्हा वाटला
अन्नाची सुद्धा केली स्पर्धेा
😞😞😞
विचारांची माडंणी पासुन
शेतातील काढणी पर्यंत
सुरू केली कोणी स्पर्धा

माथी चढले आहे
भुत हे स्पर्धेच
नव्या पिढीला हे जखडतय
या मध्ये नवजातांना ओढतय
स्पर्धेच्या नावा खाली गुणवत्ता सोडुन
वैर दुश्मनीला ठेवत आहे मनाला जोडुन

सोड तरूणा ती स्पर्धा
ती जाईल घेऊन तुला मर्दा
काहीनां वाटेल बोलतो मी निशफळ
लिहीले आहे ते वायफळ
म्हणुन का संपेल ही स्पर्धा
देशाच्या भविष्याची सुरू होईल स्पर्धा
पहा मग तुम्ही
स्पर्धा..स्पर्धा....
स्पर्धा.....स्पर्धा..........
..........................
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:खडकी ता.दौंड
जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

Sunday, 6 November 2016

मनातील विचार

➖➖➖➖➖➖➖➖➖
मनातील विचार
➖➖➖➖➖➖➖➖➖
वेळ तर सरली होती
काळजी पण संपली होती
तीला आज ही विसरलो नाही
आपुलकी मात्र राहीली नाही

ती प्रेम करत होती
कधी ती भीत होती
तिच्या विना राहवत नाही
परत प्रेम मात्र होतच नाही

ती आज पण पहात आहे
मी मात्र आता तीचा नाही
प्रेम आज विरले आहे
ह्रदय काय धडकलेच नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖
.............✍🏻
कवी
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
       जि.पुणे
मो.नं ८६००१३८५२५

http://nageshtipare.blogspot.in

Thursday, 3 November 2016

तीच्या वर

क्षणात याव
मानत रहावं
चांदणी पाहुन
तिझंच व्हावं
पाण्या बरोबर
झुळझुळ वहावं
काजव्या सारखं
रात्र भर भिराव
पहाटेच्या वेळी
दव होऊन बसाव
पक्षी होऊन
मनसेक्त ऊडावं
पाडस परी
धुडधुड पळावं
कोकीळे संग
मंजुळ गीत गाव
जीवनात येऊन
एकदा तरी
प्रेम कराव
जीच्यावर प्रेम का कराव
तिच्या साठीच मरावं
✍🏻.......
नागेश शेषराव टिपरे
८६००१३८५२५

Wednesday, 2 November 2016

ती अनं मी

ती ने थांबलेल पाहुन
वाटलं मी काही वेळ थांबाव
इतरांची नजर चुकवुन
तीच्याशी थोड बोलाव
ती नसताना काढलेली आठवण
तीच्या समोर मांडवी
भरलेल्या मनाने तिला
कडकडुन तिला मिठी मारावी
तिने ही मला मिठीत घ्याव
हुंदक्याने भरलेल्या मनाचा
अश्रु ओघळलेल्या गालावर
प्रेमाने तीने ओठ टेकवावे
पण
ती कधी थांबायचीच नाही
थांबलीच तर बोलायची नाही
तिच्या आशा वागण्याने मी ही बोलायचो नाही
मी नाही बोललो म्हणुन
दिवस भर तिचं रडनं
कधी थांबयचं नाही
कधी थांबायचं नाही
----------------------------------
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड
जि.पुणे
मो.नं ८६००१३८५२५

Tuesday, 4 October 2016

माझी गाय

माझी गाय

पोटात भुकेचा ऊठता डोंब,
त्या वासरचा हंबरडा फुटला.
अनं मेलेल्या गाईला पाहुन,
जीव माझा तीळ तीळ तुटला.

खुप तरफडली ती,
पोटात पडली आग.
गाय माझी गेली,
राहीला मागे तो माग.

शेवटी न्हेताना तिला,
थरथरला माझा हात.
खुप केली होती दवा,
पण नशिबाने सोडली साथ.

पुरून तिला आलो,
पण तुटली नव्हती माया.
रिकाम्या दावणी कडे पहातां,
खचली माझी काया.

पुन्हा एकदा त्या वासराचा,
आकांताने हंबरडा फुटला.
मिठी त्याला घेता;
आश्रु वरचा ताबा मात्र सुटला......
आश्रु वरचा ताबा मात्र सुटला......

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५